आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Youth Had Jumped Into The Sabarmati River To Commit Suicide; Freed By Fishermen After 3 Days

अहमदाबाद:आत्महत्या करण्यासाठी तरुणाने साबरमती नदीत घेतली होती उडी; 3 दिवसांनी मच्छीमारांनी केली सुटका

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नदीत डोंगरावरून उडी घेतली परंतु, एका झाडावर अडकला

गुजरातच्या अहमदाबाद येथील एका तरुणाने आत्महत्या करण्यासाठी डोंगरावरून साबरमती नदीत उडी मारली. परंतु, तो नदीत न पडता एका झाडावर अडकला. विशेष म्हणजे, तीन दिवस तो त्या झाडावर बसून होता. दरम्यान, एका मच्छीमाराने त्याला पाहिले. पोलिसांच्या मदतीने त्याची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी सांगितले, तरुणाचे नाव त्रिलोकसिंह नकुम आहे. त्याने कौटुंबिक भांडणाला कंटाळून आत्महत्या करण्याचा विचार केला. साबरमती नदीच्या किनाऱ्यावर तो गेला. नदीत डोंगरावरून उडी घेतली. परंतु, एका झाडावर अडकला. तीन दिवस झाडावरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एका मच्छीमाराने त्याला पाहिले. त्याने पोलिसांना ही माहिती कळवली.

घटनास्थळी पोलिसांनी अग्निशमन दलास पाचारण केले. त्यांनी तरुणाचे प्राण वाचवले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची चौकशी केली. परंतु, भांडणाचे कारण त्याने पोलिसांना सांगितले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...