आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या कुशीतून बाळाची चोरी, VIDEO:रस्त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेला बोलण्यात गुंतवणून चोर बाळ हिसकावून पसार

सहारनपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोर आईच्या मांडीवरून बाळाला हिसकावून अशा पद्धतीने पळाला. 

उत्तर प्रदेशाच्या सहारनपूरमध्ये आईच्या कुशीत दूध पिणारे बाळ चोरण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा संपूर्ण थरार CCTVत कैद झाला आहे. महिलाच्या तक्रारीनुसार पोलिस आता या चोराचा शोध घेत आहेत.

एका घराबाहेर बसली होती महिला

पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. पीडित हिना मिशन कंपाउंड कॅम्प कॉलनीतील एका घराबाहेर बसली होती. तिच्या मांडीवर 7 महिन्यांचा शिवा होता. ती त्याला दूध पाजत होती. तेव्हाच एक चोर फिरत आला. त्याने तिला 10 रुपये दिले. विचारले - मांडीवर काय आहे? महिला म्हणाली -हे माझे बाळ आहे. ती कपडा काढून आपले बाळ दाखवते. त्यानंतर काही कळण्याच्या आतच चोर बाळाला हिसकावून पळून जातो.

CCTV पोलिसांसाठी मोठा क्लू

या घटनेमुळे घाबरलेली हिना आरोपीच्या मागे धावते. पण तिला तो पकडता येत नाही. आता पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. महिलेने सांगितले की, ती कॉलनीत कचरा वेचून व भीक मागून आपला उदरनिर्वाह करते.

आरोपीचे छायाचित्र आसपासच्या शहरांत पाठवले

SP सिटी अभिमन्यु मांगलिक यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींचे फोटो काढून ते आसपासच्या जिल्ह्यांत पाठवण्यात आले आहेत. या छायाचित्रांत त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. पण अंगकाठीच्या हिशोबाने संशयित तरुणांची चौकशी केली जात आहे.

आता आम्ही तुम्हाला सहारनपूरमधील मुले चोरीच्या काही घटनांविषयी सांगतो...

4 ऑक्टोबर 2022 : गोविंदनगर भागात एका तरुणाने जिममध्ये शिरून एका मुलाला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण सावध कुटुंबाने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जिममधील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.

10 सप्टेंबर 2022 : परौली गावात एका तरुणाची हत्या झाल्यानंतर शुक्रवारी मुले चोरणारा समजून एका महिला व पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आली. या दोघांनी पोलिस ठाण्यात जावून आपले प्राण वाचवले. पोलिसांनी चौकशीनंतर त्यांना सोडले.

बातम्या आणखी आहेत...