आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ...then Brother sister Marriage Cannot Be Arranged; Decision Of The Court Of Kerala

परंपरेवर लगाम:...तर लावता येणार नाही भाऊ-बहिणीचे लग्न; केरळच्या कोर्टाचा निर्णय

कोट्टायम / के. ए. शाजी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळमधील एक ख्रिश्चन समुदाय स्वत:ला जातीयदृष्ट्या शुद्ध मानतो. आपली ही शुद्धता कायम राखण्यासाठी भाऊ-बहिणीचे लग्न करून दिले जाते. मात्र, आता कोर्टाने या परंपरेवर लगाम लावला आहे. कोटट्ायम कोर्ट म्हणाले, हे धार्मिक प्रकरण नाही.वस्तुत: कनन्या कॅथलिक समुदाय स्वत:ला ७२ ज्यू-ख्रिश्चन कुटुंबीयांचे वंशज मानतो. ते इ.स. ३४५ मध्ये थॉमस ऑफ किनाई व्यापाऱ्यासोबत मेसोपोटामियाहून इथे आले होते. किनाई हेच नंतर कनन्या झाले. ते आपली जातीय शुद्धता कायम ठेवण्यासाठी समाजाच्या बाहेर लग्न करत नाहीत. कुणी केल्यास त्याला समाजातून बहिष्कृत केले जाते. त्याच्या चर्च किंवा कब्रस्तानात जाण्यावरही बंदी घातली जाते. तो नातेवाइकांचे लग्न किंवा इतर कार्यक्रमांना जाऊ शकत नाही.

मात्र, पुरुषाने बाहेरील मुलीशी विवाह केला व त्या मुलीचा मृत्यू झाला तर त्याला पुन्हा समाजात घेतले जाते. मग त्याला समुदायातील एखाद्या मुलीशी लग्न करावे लागते. मात्र, पहिल्या पत्नीची मुले समुदायात आणू दिले जात नाहीत. त्यामुळे अनेकदा एकाच कुटुंबात लोक वेगवेगळ्या पंथाचे अनुसरण करतात. केरळच्या कोट्‌टायम आणि आसपासच्या जिल्ह्यांत १,६७,५०० असे सदस्य आहेत.

बातम्या आणखी आहेत...