आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ... Then Twitter Will Not Get Legal Protection, The Delhi High Court Ruled Against The Rules

नवी दिल्ली:...तर टि्वटरला कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, नियमांवरून दिल्ली उच्च न्यायालयाने खडसावले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नियमांचे पालन न केल्यास सरकारने कारवाई केली तर कोणतेही कायदेशीर संरक्षण मिळणार नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरला बजावले आहे. नव्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) नियमांचे कंपनीने पालन न केल्यासंदर्भातील प्रकरणात गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्या. रेखा पल्ली यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सुनावणीच्या वेळी कंपनीच्या वतीने शपथपत्र सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, त्यांच्याकडून अंतरिम तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती ११ जुलैपर्यंत केली जाईल. अंतरिम संपर्क अधिकाऱ्याची नियुक्तीही येत्या दोन आठवड्यांत केली जाईल. तसेच पहिला कम्प्लायन्स (नियमांचे अनुपालन) अहवालही ११ जुलै रोजी जाहीर केला जाईल.

कंपनीने सांगितले की, अंतरिम मुख्य शिस्तपालन अधिकाऱ्याची नियुक्ती दोन दिवस आधीच झाली आहे. ते भारताचे रहिवासी आहेत. मात्र स्थानिक तक्रार निवारण अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी कंपनीने दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. याबाबत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाही माहिती देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...