आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुले (१०-१२ वर्षांपेक्षा कमी) आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक या वयोगटाला विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात होता. देशात रविवारीच कोरोनाच्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी कोणतीही लस १८ वर्षांखालील मुलांना दिली जाणार नाही, अशी माहिती सोमवारी समोर आली आहे.
डीसीजीआयने ‘कोविशील्ड’ लसीला १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास मंजुरी दिली आहे, तर ‘कोव्हॅक्सिन’ला १२ वर्षांवरील व्यक्तींवर फक्त चाचणी घेण्यास मंजुरी दिली आहे. ही तिसऱ्या टप्प्याची चाचणी असेल. आरोग्य विभागाने सांगितले की, मार्चपर्यंत तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीचे निकाल समोर येतील. त्या आधारावरच १२ वर्षांवरील व्यक्तींना ‘कोव्हॅक्सिन’च्या लस देण्यास मंजुरी दिली जाऊ शकेल. ‘कोविशील्ड’चे उत्पादन सीरम तर ‘कोव्हॅक्सिन’ची निर्मिती भारत बायोटेक व आयसीएमआर करत आहेत.
लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरच कोरोनाचेे उपचार पूर्ण होतील आणि तुमची प्रतिकारक क्षमता विकसित होईल
- कर्करोग, मधुमेह यांसारख्या गंभीर आजाराचे रुग्ण लस घेऊ शकतात?
होय, कारण असे लोक उच्च जोखीम असलेल्या श्रेणींत येतात.
- आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही आता लस दिली जाईल?
सुरुवातीच्या टप्प्यात लसींचा पुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे आधी प्राधान्य गटातील लोकांनाच लस दिली जाईल. नंतर सर्वांना.
- लस खूपच कमी वेळेत तयार झाली आहे, ती सुरक्षित आहे का?
देशाच्या औषधे महानियंत्रकांनी लसींना मंजुरी देताना सांगितले की, दोन्ही लसी ११०% सुरक्षित आहेत.
- लस घरीच दिली जाईल का?
लसीकरण सरकारी रुग्णालयात किंवा इतर परिसरात स्थापन केंद्रांत होईल. तुम्हाला लस घेण्यासाठी या केंद्रांतच जावे लागेल.
- लस घेण्यासाठी नोंदणी कशी करावी लागेल?
कोविन अॅप/वेबसाइटवर मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी लागेल. आधार किंवा सरकारमान्य इतर आयडी अपलोड करून नोंदणी करू शकता. लस केव्हा-कुठे दिली जाईल याची माहिती एसएमएसद्वारे मिळेल. लस घेण्यासाठी सध्या नोंदणी सुरू झालेली नाही. नोंदणी झाल्याशिवाय लस मिळणार नाही.
- लसीचे किती डोस दिले जातील आणि त्यात किती अंतर राहील?
दोन डोस दिले जातील. पहिला दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल.
- दोन्ही डोसे घेणे आवश्यक आहे का?
वैज्ञानिकांच्या मते, दोन्ही डोस घ्यायला हवेत, तेव्हाच विषाणूचा उपचार पूर्ण होईल आणि प्रतिकारक क्षमता विकसित होईल.
- लस दरवर्षी घ्यावी लागेल का?
लोकांमध्ये विकसित प्रतिकारक क्षमतेच्या माहितीचे आकडे समोर आल्यावरच ते स्पष्ट होईल.
तज्ज्ञांचा सल्ला- ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांनी मद्यप्राशन करणे टाळावेच
मद्यप्राशन केल्यामुळे पांढऱ्या रक्तपेशींचे आणि लिंफोसाइट्सचे नुकसान होते. त्या विषाणूंशी लढण्यासाठी विशेष प्रकारचे प्रोटीन तयार करतात. ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठाच्या संशोधनात ही माहिती समोर आली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर मद्यप्राशन करणे टाळावे, असा सल्ला संशोधनात देण्यात आला आहे.
आमच्या इबोला लसीची चाचणी कधी पूर्ण झाली नाही, पण डब्ल्यूएचओने मंजुरी दिली
आम्ही १२३ देशांसाठी लसी बनवल्या. आमच्या इबोला लसीची मानवी वैद्यकीय चाचणी कधीही पूर्ण झाली नाही, तरीही डब्ल्यूएचओने तिच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती.’ - डॉ. कृष्णा एल्ला, एमडी, भारत बायोटेक
राजकारण सुरू | काँग्रेसच्या मिलिंद देवरांकडून कोव्हॅक्सिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित
काँग्रेसचे नेते शशी थरूर व जयराम रमेश यांच्यानंतर मिलिंद देवरांनीही तिसऱ्या टप्प्याची चाचणी पूर्ण होण्याआधी ‘कोव्हॅक्सिन’ला मंजुरी देण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देवरा म्हणाले,‘विश्वास निर्माण होण्यासाठी पंतप्रधानांनी समोर यावे.’ भाजपने म्हटले की, काँग्रेसला वैज्ञानिकांवर विश्वास नाही, तो पक्ष राजकारण करत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.