आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्यक्ष करसंकलनामध्ये 26 टक्क्यांनी झाली वृद्धी:3.63 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले करसंकलन

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करसंकलन २६ टक्क्यांनी वाढून १३.६३ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. या वृद्धीमध्ये टीडीएस कपात आणि कॉर्पोरेट अॅडव्हान्स टॅक्स कलेक्शनचे विशेष योगदान राहिले आहे.

अधिकृत माहितीनुसार, रिफंडच्या समायोजनानंतर चालू आर्थिक वर्षात एकूण प्रत्यक्ष कर संकलन ११.३५ लाख कोटी रुपये राहिले. यामध्ये वैयक्तिक आणि कॉर्पोरेट कराचा समावेश आहे. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन बजेटचे अंदाजित उद्दिष्ट १४.२० टक्क्यांच्या सुमारे ८० टक्के आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीटडीटी) सांगितले, १७ डिसेंबरपर्यंत २.२८ लाख कोटी रुपयांचे रिफंड जारी केले आहेत. ते एक वर्षापूर्वीच्या तुलनेत ६८ टक्के अधिक आहे.

पहिल्या ३ तिमाहीत १२.८३% वाढले आगाऊ करसंकलन : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी आगाऊ करसंकलन ५.२१ लाख कोटी रुपये आहे. यामध्ये १२.८३% वाढ झाली. सीबीडीटीनुसार, या आर्थिक वर्षात आतापर्यंत इन्कम अँड कॉर्पोरेशन टॅक्सद्वारे निव्वळ संकलन ११.३५ लाख कोटी रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...