आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेलकाता:ममतांविरुद्ध घातपात नाही; पर्यवेक्षकांनी दिला अहवाल, मुख्य सचिवांच्या अहवालावर निवडणूक आयोग असमाधानी

काेलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील हल्ल्याच्या प्रकरणात पर्यवेक्षकांनी शनिवारी सायंकाळी आपला अहवाल निवडणूक आयोगाकडे सोपवला. ममतांना झालेली दुखापत ही घातपात नव्हे, तर घटना असल्याचे म्हटले आहे. विशेष पोलिस पर्यवेक्षक विवेक दुबे आणि विशेष पर्यवेक्षक अजय नायक यांच्या या अहवालात ममतांवर हल्ला झाल्याचा इन्कार करण्यात आला आहे.

तत्पूर्वी, बंगालचे मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांचा अहवाल अर्धवट असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. आयोगाने संध्याकाळपर्यंत घटनेचा सविस्तर अहवाल देण्यास मुख्य सचिवांना सांगितले आहे. मुख्य सचिवांनी अहवाल आयोगाकडे सोपवला, मात्र त्यातील माहिती स्पष्ट नाही.

माजी भाजप नेते यशवंत सिन्हा तृणमूलमध्ये
ज्येष्ठ नेते यशवंत िसन्हा यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडणुकीचा प्रचार करता येऊ नये म्हणून ममता बॅनर्जींवर हल्ल्याचा कट होता, अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधान माेदींच्या धोरणांवर टीका करणाऱ्या सिन्हा यांनी सन २०१८ मध्ये भाजपला रामराम केला होता. ते वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

बातम्या आणखी आहेत...