आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • There Is No Benefit In Increasing The Lockdown; Good Food In Quarantine Center, Benefit If WiFi Facility Is Provided: Dr. Shetty

इंटरव्हू:लॉकडाऊन वाढवून फायदा नाही; क्वॉरंटाइन केंद्रात चांगले जेवण, वायफाय सुविधा दिल्यास फायदा निश्चित : डॉ. शेट्टी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रख्यात कार्डियाक सर्जन व नारायणा हेल्थचे अध्यक्ष म्हणाले- दिल्लीकडून धडा घ्या

(पवन कुमार)

प्रख्यात कार्डियाक सर्जन व नारायणा हेल्थचे अध्यक्ष डॉ. देवी शेट्टी यांचे मत आहे की, मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर राज्यांमध्ये परतल्यानंतर त्यांची तपासणी व क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्याच्या काळात त्यांना राहण्यासाठी जागा व जेवण चांगले मिळावे. अमर्यादित वायफाय मिळेल याकडे लक्ष द्यावे लागेल. असे न झाल्यास लोक दोन-तीन दिवसांतच केंद्र सोडतील. यातील एक जरी बाधित असला व तो बाहेर गेला तर स्थिती भयंकर होऊ शकते. आधीच दिल्लीकडून आपण धडा घेतला आहे. हजार लोकांमुळे रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यांच्यासोबतच्या बातचीतचे मुख्य अंश...

आता नेहमीच मास्क, ६ फूट अंतराची सवय करा, ज्येष्ठांनी बाहेर निघू नये, सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी करा

- गर्दीच्या ठिकाणी जायचे नाही. प्रत्येक वेळी मास्क लावणे. एकमेकांपासून कमीत कमी सहा फूट अंतर ठेवायचे आहे. कुणाला स्पर्श करायचा नाही. सार्वजनिक वाहतुकीचा कमीत कमी वापर करणे आणि त्यात गर्दी असू नये. खूप आवश्यक असेल तेव्हाच घरातून बाहेर निघा. घरातील ज्येष्ठ किंवा जे आजारी आहेत त्यांना बिलकुल बाहेर जाऊ देऊ नका आणि त्यांच्या गरजा मोठ्यांनी पूर्ण कराव्यात.

> लॉकडाऊनचा फायदा किती आहे, तो आणखी वाढवण्याची गरज आहे का?

आता प्रत्येक ठिकाणी लाॅकडाऊन वाढवल्याने वैद्यकीयदृष्ट्या खूप फायद्याचे नाही. भारत मोठा देश आहे. युरोपसारखीच येथेही धोरण आखण्याची गरज आहे. सर्व ठिकाणची समस्या वेगवेगळी आहे. प्रत्येक राज्याला आपल्या स्थितीनुसार धोरण ठरवायला हवे व निर्णयाचा अधिकार जिल्हा प्रशासनाला द्यायला हवा.

> भारताने खूप आधी लॉकडाऊनचा निर्णय घेतला, याचा किती फायदा झाला?

भारताचा दृष्टिकोन खूप चांगला होता. असे नसते तर आज मृतांचा आकडा दुप्पट असता व रुग्णही खूप वाढले असते. जेवढे रुग्ण ६ महिन्यांत येतील, तेवढे दोन आठवड्यांत आले असते. मग त्यांना सांभाळणे कठीण झाले असते. अमेरिका-इटलीत हेच झाले.

> लॉकडाऊन किंवा त्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंगचे याेग्य पालन न झाल्यास काय होईल?

फिजिकल डिस्टन्सिंगमध्ये निष्काळजीपणा झाला तर भारताची स्थितीही इटलीसारखी होऊ शकते, जेथे एक-एक दिवसात हजारोंच्या संख्येत रुग्ण येतील आणि मृतांची संख्याही त्याच वेगाने वाढेल. मोठमोठ्या देशात व्हेंटिलेटर, पीपीई किट, डॉक्टर्स आणि औषधांची टंचाई झाली.

> हर्ड इम्युनिटी केव्हा विकसित होईल?

हर्ड इम्युनिटी विकसित होण्यासाठी कमीत कमी ५०% लोकांना या विषाणूने बाधित व्हावे लागेल. कमीत कमी दोन-तीन वर्षे लागतील.

> जास्त तपासणी केल्याने काय फायदा होईल?

जास्त तपासणीमुळे बाधित ओळखून त्यांना क्वॉरंटाइन केले जाऊ शकते. लक्षणे नसलेल्या रुग्णांना वेगळे केले न गेल्यास ते घरातील वयस्करांना बाधित करतील. अजूनही पुरेशी तपासणी होत नाहीये कारण पूर्ण जगात आरटी-पीसीआर तपासणीत वापरल्या जाणाऱ्या री-एजंटची कमतरता आहे.

बातम्या आणखी आहेत...