आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • There Is No E Darshan Devdarshan ... The Whole Country Is Unlocked, Then Why Religious Places Are Closed: Supreme Court

दिव्य मराठी विशेष:ई-दर्शन देवदर्शन नसते... संपूर्ण देश अनलॉक होतोय, मग धार्मिक स्थळे बंद का : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मर्यादित संख्येत दर्शनाची व्यवस्था राज्य सरकारने करावी

कोरोनामुळे देशभरात बंद असलेली मंदिरे, मशिदी व इतर धार्मिक स्थळांबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने शुक्रवारी ई-सुनावणी करताना राज्य सरकारवर झारखंडमध्ये देवघर येथील वैद्यनाथ धाम मंदिर प्रकरणात ई-दर्शन म्हणजे देवदर्शन नसते असे ताशेरे ओढले. तसेच सरकारने मर्यादित संख्येत केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दर्शनाला परवानगी देण्याचे निर्देश दिले. श्रावणात भरणाऱ्या मेळ्यात भाविकांना दर्शनाच्या परवानगीसाठी याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने ३ जुलैला केवळ ई-दर्शनाची परवानगी दिली होती. या निर्णयास भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी आव्हान दिले होते.

परवानगी दिल्यास कोरोनाचा धोका वाढेल, असा सरकारचा युक्तिवाद होता
न्यायमूर्ती मिश्रा : कोरोना काळात संपूर्ण देश उघडत असताना केवळ मंदिरे, मशीद, चर्च आणि इतर धार्मिक स्थळे बंद का?
राज्य सरकार : भाविकांना मंदिरात पूजेची परवानगी दिल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मंदिरात दर्शनासाठी वि‌विध ठिकाणाहून भाविक येतात. अशा स्थितीत त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल.
न्यायमूर्ती मिश्रा: ऐतिहासिक वैद्यनाथ धाम मंदिरात मर्यादित संख्येत भाविकांना दर्शनाची परवानगी दिली जाऊ शकते.
राज्य सरकार: सरकारने मंदिर व्यवस्थापनाच्या सहकार्याने ई-दर्शनाची सुविधा केली आहे. यामुळे कोरोनाच्या धोक्याशिवाय भाविक देवाचे दर्शन घेऊ शकतात.
न्यायमूर्ती मिश्रा (नाराज होऊन): मंदिरात ई-दर्शन करणे म्हणजे देवदर्शन नसते.
याचिकाकर्ता: प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दे‌वाकडे प्रार्थना करण्यामागील भावना वेगळीच असते.
न्यायमूर्ती मिश्रा: सरकारने येणाऱ्या पौर्णिमेला व भाद्रपद महिन्यात भाविकांसाठी मंदिरात दर्शनाची व्यवस्था लागू करावी. सरकार हवे असल्यास ई-टोकनचा पर्याय वापरू शकते.