आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • There Is No Enthusiasm For Hearing In Kashi, There Will Be No Anointing; There Used To Be Thousands Of Devotees In The Temple, Now Only 5 People

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळ:काशीत श्रावणाचा उत्साह नाही, जलाभिषेक होणार नाही; पूर्वी मंदिरात असायचे हजारो भाविक, आता फक्त 5 लोक

वाराणसीहून धर्मेंद्रसिंह भदौरिया10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिला श्रावण सोमवार : बाबा विश्वनाथांच्या गर्भगृहातील हे छायाचित्र भास्करचे छायाचित्रकार ओ. पी. सोनी यांनी विशेष परवानगीने काढले. - Divya Marathi
पहिला श्रावण सोमवार : बाबा विश्वनाथांच्या गर्भगृहातील हे छायाचित्र भास्करचे छायाचित्रकार ओ. पी. सोनी यांनी विशेष परवानगीने काढले.
  • भाविकांसाठी प्रथमच ऑनलाइन रुद्राभिषेकांची सुविधा; परंपरा खंडित, अभिषेकास फक्त 5 जण

देवाधिदेव महादेवाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या काशीमध्ये यावर्षी श्रावणाचा उत्साह दिसून येत नाही. घाटापासून गल्ल्यासुद्धा ओस पडल्या आहेत. श्रावणात पहिल्या सोमवारी १२ ज्योतिर्लिंगापैकी एक श्री काशी विश्वनाथाच्या मंदिरात भाविक व देवात अंतर पाळण्यात आले. कोरानामुळे कोणत्याही भाविकांस गर्भगृहात जाण्याची परवानगी नव्हती. जलाभिषेकासही बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पुजारी श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले, दर सहा तासाला मंदिराचे सॅनिटायझेशन केले जाते. मंदिरात फक्त पाच भाविक असतील. पूर्वी मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा असत. परंतु या वेळी भाविकांनी काळजी घेतली होती. प्रशासनाने सोमवारी फक्त २५ हजार भाविकांना दर्शनाची परवानगी दिली होती. तर पूर्वी सोमवारी सुमारे दोन लाखांवर भाविक दर्शनासाठी येत होते. 

दुसरीकडे गौदौलियापासून मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर सुरक्षा कर्मचारी जास्त आणि भाविकांची संख्या कमी असे दृश्य होते. ठिकठिकाणी कावडी घेऊन येणाऱ्या लोकांचे तळ यावर्षी दिसून आले नाहीत. कोरोनामुळे श्रावणात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम यावर्षी होणार नाहीत. याशिवाय नागपंचमीला (२५ जुलै) काशीमध्ये नागकूपला विद्वतजनांच्या उपस्थितीत पारंपारिक शास्त्रार्थ कार्यक्रम होणार नाही. गर्भगृहाबाहेर चारही दरवाजांना जलार्पण करण्याची सुविधा असेल, असे आयुक्तांनी सांगितले. 

प्रथमच : ऑनलाइन रुद्राभिषेक

भाविकांसाठी प्रथमच ऑनलाइन रुद्राभिषेकांची सुविधा आहे. स्पीड पोस्टने प्रसाद पाठवण्यात येणार आहे. यासाठी २५० रु. शुल्क आहे. मंदिरात रुद्राभिषेक व आरतीसाठी ३०% शुल्क वाढणार आहे. 

परंपरा खंडित : अभिषेकास ५ जण

प्रथमच मंदिरात जलाभिषेकास ५ लोक उपस्थित राहण्याची परवानगी आहे. यापूर्वी यादव समाज थेट गर्भगृहात जाऊन अभिषेक करत होता. गेल्या वर्षी एक लाख लोक गेले होते. आता फक्त ५ जण गेले. 

सुरक्षा : बाहेरच्यांना दर्शन नाही

काशीच्या सीमेवर पोलिस तैनात आहेत. बाहेरगावाहून कोणी भाविक आल्यास त्याला परत पाठवण्यात येत होतेे. शिवाय, गल्ल्या, मंदिर परिसरात पूजा, फुले, दूध, सजावटीची दुकाने असणार नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...