आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात एक शाळा अशीही आहे जी विद्यार्थी किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून शुल्क घेत नाही. ६ वर्षांपर्यंतच्या शिक्षणासाठी भोजन, निवासापासून सर्व सुविधा मोफत आहेत. शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पात्रतेनुसार सहा लाख रुपयांपर्यंत सन्माननिधीही दिला जातो. ‘श्रीमद् यशोविजयजी जैन संस्कृत पाठशाला’ ही १२५ वर्षे जुनी संस्था गुजरातेतील मेहसाणा येथे आहे. योगनिष्ठ श्रीबुद्धिसागर सुरीश्वरजी महाराज हे ऑक्टोबर १८९७ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेचे पहिले विद्यार्थी. शाळेतून आतापर्यंत २८५० विद्यार्थी बाहेर पडले आहेेत. यापैकी २२० जणांनी पूर्ण संयमित जीवनाचा स्वीकार केला आहे, तर दीक्षा घेतलेले ३६ विद्यार्थी श्रमण भगवंत आचार्य पदावर आहेत. येथील विद्यार्थी गुजरातसह तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात स्थायिक झाले आहेत.
संस्थेचे प्रकाशभाई पंडित सांगतात, दरवर्षी विद्यालयात ३० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. विद्यार्थी, त्यांचे आई-वडील किंवा नातेवाइकांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. शिक्षणादरम्यान संस्था विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये देते. चार वर्षांचे शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना एक लाख आणि ६ वर्षांचे शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना २ लाख रुपये दिले जातात. ही रक्कम दरमहा मिळणाऱ्या रकमेव्यतिरिक्त असते. कायदा आणि व्याकरणासह विशेष अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना तीन लाख रुपये सन्मान निधी दिला जातो. अनेक विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांपर्यंत सन्मान निधी देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे ज्ञान मिळावे, यासाठी १२ हजार पुस्तकांचे ग्रंथालय आहे. येथे शिकलेले विद्यार्थीच शाळेत मिलांना शिकवतात. शाळेत धार्मिक शिक्षणासह इंग्रजी, संगणक आणि संगीतही शिकवले जाते. येथील विद्यार्थी देशातील अन्य शाळांप्रमाणे अभ्यासक्रमही शिकू शकतात, मात्र अशा परिस्थितीत त्यांना माजी विद्यार्थी म्हणून शिकावे लागते. येथे कोणालाही प्रवेश मिळू शकतो.
१३ कोटी रुपये खर्चून नवीन जैन संस्कृत शाळा सुरू करण्याची तयारी शाळा व्यवस्थापनाने सांगितले, की मेहसाणा-अहमदाबाद महामार्गावरील लिंच गावाजवळ एक नवीन जैन संस्कृत शाळा सुरू करण्याची तयारी केली जात आहे. साडेसहा एकरांवर उभारल्या जाणाऱ्या या शाळेसाठी १३ कोटी रुपये खर्च येणार आहे. या शाळेची क्षमता १०० विद्यार्थ्यांची असेल. ग्रंथालय समृद्ध असेल. धर्माशी संबंधित देश-जगातील उत्कृष्ट पुस्तके, साधने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील. नवीन कॅम्पसमध्ये शाळा भवनासह वसतिगृह आणि कँटीनची सुविधा असेल. कॅम्पसमध्येच जैन मंदिराची उभारणी केली जाईल. मुनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची उभारणी केली जाईल. कालीकुंड येथील कुमारपालभाई व्ही. शाह आणि कल्पेशभाई व्ही. शहा यांनी नवीन शाळेच्या खर्चाची जबाबदारी घेतली आहे. येथे शिकून शिक्षक झालेले पीयूष त्रिवेदी सांगतात,‘सध्या मी ुूरतमध्ये व्याकरण शिकवत आहे. येथे शिकवण्याचे समाधान मिळते.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.