आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरू:हिंसाचारप्रकरणी कोणत्याही संघटनेवर तूर्त बंदी नाही; कर्नाटक सरकारची भूमिका, कायदामंत्र्यांचे स्पष्टीकरण

बंगळुरूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंसाचारामागे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेचा हात असल्याचा आरोप

बंगळुरू हिंसाचार प्रकरणामागील कथित कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्याचा राज्य सरकारचा विचार नाही, असे कर्नाटक सरकारने गुरुवारी स्पष्ट केले. बंगळुरूत ११ ऑगस्ट राेजी रात्री घडलेल्या घटनेबाबत सरकारने चर्चा सुरू केली आहे. सध्या त्याबाबत सरकार कोणत्याही निर्णयाप्रत आलेले नाही, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री जे.सी. मधुस्वामी यांनी दिली. यासंबंधी योग्य माहितीची प्रतीक्षा करत आहोत. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

बंगळुरू हिंसाचारामागे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेचा हात असल्याचा आरोप आहे. या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. ११ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला होता. १३ ऑगस्ट रोजी गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी हिंसाचारामागे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा हात असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. उपलब्ध व्हिडिओ फुटेजवरून हे सांगत असल्याचा दावा बसवराज यांनी केला होता. दुसरीकडे या संघटनेने हिंसाचारामागे हात असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

बातम्या आणखी आहेत...