आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहवाई सुरक्षा प्राधिकरण विभाग विमानतळावर अत्याधुनिक उपकरण लावणार असून सुरक्षेच्या तपासणीवेळी लॅपटॉप, मोबाइल, चार्जर काढून दाखवण्याची यापुढे गरज पडणार नाही. या उपकरणाद्वारे सुटकेस, बॅगच्या आतील भागाची तपासणी हाेईल.
अमेरिका, युरोपमध्ये असे स्कॅनरपूर्वीपासूनच वापरले जातात. हवाई वाहतूक मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसोबतच तपासणीचा वेळ घटवण्याचा उद्देश आहे. सुरुवातीला हे नवे स्कॅनर मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादेत लावले जाईल. वर्षभरात इतर ठिकाणीही असे स्कॅनर्स बसवण्यात येतील. गेल्या आठवड्यात दिल्लीत विमानतळावरील प्रवाशांच्या गर्दीमुळे सुरक्षा तपासणीसाठी वेळ लागला हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.