आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • There Is No Photo Of Nehru On The Nectar Jubilee Poster Of Independence; News And Live Updates

नवी दिल्ली:स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी पोस्टरवर नेहरूंचा फोटो नाही; काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केला निषेध

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या (आयसीएचआर) ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ पोस्टरवर माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंचा फोटो नसल्याने वाद उद्भवला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आयसीएचआरने सांगितले की, ‘ज्यांच्या योगदानाला आजवर महत्त्व मिळाले नाही, अशांना पोस्टरवर जागा देण्यात आली आहे.’

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आयसीएचआरच्या वेबसाइटचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्यात एका पोस्टरवर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदनमोहन मालवीय व स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फोटो आहेत. त्यावर थरूर म्हणाले, ‘स्वातंत्र्यसंग्रामाचा आवाज असलेल्या नेहरूंना हटवून स्वातंत्र्याचा सोहळा साजरा केला जाईल का? हे इतिहासाच्याही विरुद्ध आहे. असे करून आयसीएचआरने स्वत:चे नाव खराब केले आहे.’

बातम्या आणखी आहेत...