आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीष प्राषन:मालाला भाव नाही, वडवणीत‎ शेतकऱ्याने केली आत्महत्या‎

वडवणी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीमालाला भाव मिळत नसल्याने‎ अल्पभूधारक शेतकऱ्याने‎ आत्महत्या‎ केल्याची घटना ‎वडवणी येथे‎ घडली. डिगांबर ‎मुंजाबा वांडरे‎ (५२) या‎ अल्पभूधारक ‎शेतकऱ्याने‎ आपल्याच शेतात वीष प्राषन करून‎ आत्महत्या केली आहे.वांडरे हे‎ अल्पभुधारक असल्याने‎ त्यांच्याकडे खाजगी बॅंक व इतर‎ बॅंकाचे मिळुन चार ते पाच लाखांचे‎ कर्ज होते.ते कर्ज कसे फेडायचे या‎ विवंचनेत या शेतकऱ्याने औषध‎ घेऊन आत्महत्या केली.त्यांच्या‎ पश्चात दोन मुली,एक मुलगा,भाऊ‎ असा मोठा परिवार आहे.‎ अतिवृष्टीचे अनुदान नाही, पिक‎ विमा नाही या सर्व संकटातून‎ शेतकरी मार्ग काढण्यास अपयशी‎ ठरत असून व शासनही‎ शेतकऱ्याच्या मालाला भाव‎ वाढीसाठी कुठलाही प्रयत्न करत‎ नाही त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्या‎ वाढत आहेत. याकडे सरकारने लक्ष‎ द्यावे नसता तीव्र आंदोलन‎ करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी‎ तालुकाप्रमुख विनायक मुळे यांनी‎ दिला आहे ‎डिगांबर वांडरे‎

बातम्या आणखी आहेत...