आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • There Is No Shortage Of Diesel petrol In The Country At All Center; Many Pumps In Madhya Pradesh And Rajasthan Do Not Have Petrol

पेट्रोल तुटवडा:डिझेल-पेट्रोलचा देशामध्ये मुळीच तुटवडा नाही - केंद्र ; मध्य प्रदेश, राजस्थानात अनेक पंपांवर पेट्रोल नाही

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात पेट्रोल-डिझेलचा मुळीच तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. पेट्रोल-डिझेलचे उत्पादन मागणीची पूर्तता करण्यासाठी पुरेसे आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटकसह अनेक राज्यांत पेट्रोल पंपावर इंधनाची कमतरता असल्याचे वृत्त येत होते. त्यामुळे मंत्रालयाने भूमिका मांडली. मंत्रालयानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत जून २०२२ च्या पहिल्या सहामाहीत ५० टक्के पेट्रोल-डिझेलची मागणी वाढली. त्यातही राजस्थान, मध्य प्रदेश तसेच कर्नाटक राज्यांत जास्त मागणी वाढली. वास्तविक पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खासगी पेट्रोलिय मार्केटिंग कंपन्यांद्वारे केल्या जाणाऱ्या राज्यांत यांचा समावेश होतो. पुरवठा केली जाणारा जागा डेपोपासून दूर आहे. पेट्रोल-डिझेलच्या मागणीतील वाढ शेती कामांना वेग आल्याने झाली आहे. त्याशिवाय ठोक पेट्रोल-डिझेलचे खरेदीदार आता रिटेल पेट्रोल पम्पावरूनही खरेदी करू लागल्याने अडचणीत भर पडली आहे.

-४१ टक्के पेट्रोल, तर ३२ टक्के डिझेलची मागणी राजस्थानात वाढली - मध्य प्रदेशात पेट्रोलची मागणी ४१ टक्के, डिझेल ४६.१ टक्के वाढले

बातम्या आणखी आहेत...