आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • There Is No Shortage Of Hydroxychloroquine, Which Will Be Vigilant In The Future; Health Ministry Spokesperson Agarwal Informed The Press Conference

दिल्ली:हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची टंचाई नाही, भविष्यातही दक्षता घेणार; आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • साखळी, प्रसार रोखण्याकडे विशेष लक्ष

देशात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची कोणतीही टंचाई नसून या औषधाचा साठा पुरेशा प्रमाणात असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते लव अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत या अौषधांचा सर्वात मोठा उत्पादक आहे. देशात औषधांच्या साठ्यावर उच्चस्तरीय देखरेख केली जात असून भविष्यातही या औषधांची टंचाई भासणार नाही. त्यांनी सांगितले की, हे औषध नोंदणीकृत डॉक्टरांच्या सल्ल्यावरच दिले जाते आणि ते कोरोना विषाणूने ग्रस्त रुग्ण, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर किंवा रुग्णांची काळजी घेणाऱ्या नातेवाइकांनाच ‘प्रोफाइलेक्सिस’ च्या आधारे दिले जात आहे. औषधापासून बरेच दुष्परिणाम होत असल्याने ते कुणीही घेणे चुकीचे आहे.  अग्रवाल यांनी कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत सांगितले की, देशात मंगळवार ते बुधवारदरम्यान ७७३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ५ हजार १९४ झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०२ जण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात अाले आहे. त्यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत त्यानुसार त्याचा मुकाबला करण्यासाठी राज्यांमध्ये तयारी केली जात आहे. या संसर्गाची साखळी आणि त्याचा प्रसार रोखण्याकडे विशेष लक्ष दिले जात अाहे. यात राज्य सरकारांची महत्त्वाची भूमिका आहे. याच प्रकारे सर्व राज्यांमध्ये जिल्हा पातळीवर प्रशासन आपल्या पातळीवर सर्व ते प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील पुणे आणि कोंढवा परिसरात ३० किलोमीटर भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जात कोरोना संशयितांसोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची तपासणी करत आहेत. त्यांनी प्रवास केला आहे का, तसेच बाहेरून आलेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते का, याबाबत माहिती घेतली जात आहे.

साखळी, प्रसार रोखण्याकडे विशेष लक्ष

या संसर्गाची साखळी आणि त्याचा प्रसार रोखण्याकडे विशेष लक्ष दिले जात अाहे. यात राज्य सरकारांची महत्त्वाची भूमिका आहे. याच प्रकारे सर्व राज्यांमध्ये जिल्हा पातळीवर प्रशासन आपल्या पातळीवर सर्व ते प्रयत्न करत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. 
महाराष्ट्रातील पुणे आणि कोंढवा परिसरात ३० किलोमीटर भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जात कोरोना संशयितांसोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची तपासणी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...