आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी काही वेळात घरी परत येईल असे वाटते, पण..:नवसारी रेप प्रकरणात वर्ष लोटले तरी न्याय नाही; पीडितेच्या आईचा न्यायासाठी टाहो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'माझ्या मुलीला जावून वर्ष लोटले. पण अद्याप न्याय मिळाला नाही. वलसाड पोलिस, वडोदरा पोलिस, क्राइम ब्रॅन्चसह स्वतः गृहमंत्र्यांनी तपास केला. पण न्याय झाला नाही... मी मध्यरात्री 3 वाजता उठून माझ्याच मुलीला विचारते...तूच सांगत तुझ्यासोबत काय घडले... ती आता येईल... मग येईल असे वाटते. पण आता ती केव्हाच येणार नाही...' असे म्हणताच नवसारीच्या आईच्या दोन्ही डोळ्यांत अश्रूंच्या धारा वाहू लागतात. त्यांची प्रेमळ मुलगी आता या जगात नाही. तिच्यावर वडोदऱ्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिचा मृतदेह वलसाड रेल्वेस्थानकावरील गुजरात क्वीन रेल्वेच्या एका डब्यात आढळला. वर्ष लोटले पण या प्रकरणात न्याय झाला नाही. आता पीडित आईने हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे.

पीडित आईचे छायाचित्र.
पीडित आईचे छायाचित्र.

वर्ष लोटले, पण न्याय नाही

3 नोव्हेंबर 2021 रोजी वलसाड रेल्वेस्थानकावर उभ्या गुजरात क्वीन एक्सप्रेसच्या एका डब्यात एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. सकृतदर्शनी ही आत्महत्येची केस वाटत होती. पण नंतर हे सामूहिक बलात्काराचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी 18 हून अधिक तपास यंत्रणा तपास करत आहेत. अनेक महिने लोटले, पण काहीच हाती लागले नाही. पीडित कुटुंब अद्याप न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

पोस्टमॉर्टममध्ये बलात्काराची पुष्टी, पण एफएसएफ निगेटीव्ह

गतवर्षी या दिवसांत सर्वजण दिवाळीच्या आनंदात मग्न होते. पय़ण नवसारीच्या हे कुटुंब दुःखाच्या सागरात लोटले गेले होते. वडोदऱ्याच्या ओएसिस संस्थेत काम करणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर तिचा मृतदेह वलसाडमध्ये आढळला. या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी डीजीपींनी एसआयटीची स्थापना कली. 300 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली. मुलीचे एका रिक्षाच्या मदतीने अपहरण करण्यात आले होते. त्यामुळे आसपासच्या 1000 हून अधिक रिक्षाचालकांचा जबाब नोंदवण्यात आला. सामूहिक बलात्कार झालेल्या व्हॅक्सीन संस्था मैदानाच्या आसपासच्या सोसायट्यांतही घरोघरी जाऊन चौकशी करण्यात आली. या प्रकरणात शवविच्छेदन अहवालात बलात्काराची पुष्टी झाली. पण एफएसएलमध्ये रेपचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. मुलीच्या गुप्तांगात झालेल्या अनेक जखमांच्या आधारावर तपास करण्यात आला. पण वर्ष लोटले तरी पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही.

वडोदऱ्याच्या व्हॅक्सिन ग्राउंडमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता.
वडोदऱ्याच्या व्हॅक्सिन ग्राउंडमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता.

मुलीच्या आईला OASIS संस्थेवर संशय

मुलीच्या कुटुंबाला आजही OASIS संस्थेवर संशय आहे. माझ्या मुलीला या संस्थेचे काहीतरी काळेबेरे माहिती होते. त्यामुळेच तिला सामूहिक बलात्कार करून संपवण्यात आले, असा पीडित आईचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

वलसाड रेल्वेस्थानकावर गुजरात क्वीन एक्सप्रेसच्या डब्यात मृतदेह आढळला होता.
वलसाड रेल्वेस्थानकावर गुजरात क्वीन एक्सप्रेसच्या डब्यात मृतदेह आढळला होता.

तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी

मृत तरुणीच्या आईने सांगितले की, घटनेला 1 वर्ष झाले. पण न्याय मिळाला नाही. या प्रकरणी नियुक्ती करण्यात आलेली एसआयटीही भंग करण्यात आली. तपास अधिकाही बदलण्यात आले. नव्या अधिकाऱ्यांना कदाचित या प्रकरणाची खोली माहिती नसेल. काही दिवसांपूर्वी मी त्रिवेदी सरांना फोन केला. पण त्यांनी तपास सुरू असल्याचे सांगून फोन कट केला. आता ते माझा फोन उचलत नाहीत. तपासात हर्ष संघवीही सहभागी होते. त्यांनी मला पूर्ण आश्वस्त केले होते. माझा तेव्हा त्यांच्यावर विश्वास होता. त्यामुळे हट्ट धरला नाही. पण आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची माझी मागणी आहे. सीबीआयने वडोदऱ्यातील ओएसिस संस्थेची चौकशी करून माझ्या मुलीला न्याय मिळून दिला पाहिजे.

कुटुंबाने आता हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे.
कुटुंबाने आता हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...