आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • There Was No Father, A Wax Statue Kept At The Wedding The Passionate Girl Hugged The Father In The Tent, The Audience Get Emotional.

वडिल नव्हते, लग्नात ठेवला मेणाचा पुतळा:भावूक मुलीने मंडपात वडिलांना मारली मिठी, उपस्थितांचे पाणावले डोळे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जगात सर्व काही स्वार्थावर अवलंबून आहे मात्र असे असताना फक्त वडील आणि मुलीचे नाते हे एकच नाते अशे आहे कि जे प्रेमावर अवलंबून आहे. बाप-लेकीच्या प्रेमाचा एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका लग्नाचा आहे, मात्र तो पाहून लोक भावूक होतांना दिसून येत आहेत. वास्तविक, वडील गमावल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या दिवशी तिच्या कुटुंबीयांनी मंडपात वडिलांचा मेणाचा पुतळा ठेवला होता. हे पाहून मुलीला धक्का बसला आणि तिने पुतळ्याला मिठी मारली. हमसून हमसून ती रडू लागली.

भावनिक झालेल्या मुलीने मारली वडिलांच्या पुतळ्याला मिठी

​​​व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वडिलांचा पुतळा पाहून मुलगी भावूक झाली आणि त्यांचे चुंबन घेऊ लागली. या दरम्यान सर्व नातेवाईकांचे डोळे ओले झाले. कुटुंबातील सदस्यही पुतळ्यासोबत फॅमिली फोटो क्लिक करताना दिसत आहेत.

सेल्वरेज यांच्या मेणाच्या पुतळ्यासह कौटुंबिक फोटो.
सेल्वरेज यांच्या मेणाच्या पुतळ्यासह कौटुंबिक फोटो.

तमिळनाडू गावातील प्रकरण

ही घटना तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यातील थानाकानंदल गावातील आहे. मार्चमध्ये 56 वर्षीय सेल्वरेज यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सेलव्हरेज जिवंत असताना त्यांना आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात करायचे होते. जूनमध्ये मुलीचे लग्न झाले तेव्हा तिला वडिलांची कमतरता भासू नये म्हणून कुटुंबाने मुलीसाठी ही सुंदर भेट देण्याची योजना आखली.