आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • There Was No Western Disturbance This Year ... As A Result, Summer Two Weeks Ago

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्लोबल वॉर्मिंगचे प्रत्यक्ष दर्शन:यंदा पश्चिम विक्षोभ आले नाही...परिणामी दोन आठवड्यांआधीच उन्हाळा

नवी दिल्ली/डेहराडून/वाराणसीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाराणसीत गंगा फेब्रुवारीतच घाटाच्या 50 फूट मागे

तुम्हाला फेब्रुवारीतच अचानक जास्त उकाडा जाणवू लागला असेल तर हा भास नाही. खरे तर यंदा दोन आठवड्यांआधीच उन्हाळा सुरू झाला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात देशातील पठारी भागांत कमाल तापमानात सरासरीपेक्षा ५-८ अंशांची वाढ नाेंदवली जात आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेटचे वैज्ञानिक महेश पलावत यांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे फेब्रुवारीत ४ ते ५ पश्चिम विक्षोभ येत असतात. त्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डाेंगराळ राज्यांत बर्फवृष्टी तर पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश व राजस्थान या उत्तर-पश्चिम मैदानी राज्यांतील सर्वच भागांत १ -२ दिवस पाऊस पडतो. मात्र, यंदा ४ फेब्रुवारीनंतर कोणत्याही पश्चिम विक्षोभाचा परिणाम मैदानी भागांत झाला नाही.

गेल्या २३ दिवसांत कोणत्याही मैदानी भागात नोंद घेण्याइतका पाऊस झालेला नाही. युरोपच्या खाली भूमध्य सागरामधून जे ढग पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचत होते, ते ढग यंदा हिमालयाच्या पर्वतांना धडकण्याआधीच काश्मीरमार्गे मध्य आशियाकडे सरकून गेले. कोणत्याही प्रकारची हवामान हालचाल न झाल्यामुळे मैदानी भागांतील तापमान दिवसेंदिवस वाढतच गेले. तथापि, १ मार्चला पंजाब, हरियाणा, दिल्ली व राजस्थानात पुन्हा एकदा तापमानात किरकोळ घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर आता या हंगामात पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता अत्यंत कमीच आहे. तथापि, त्यात एक सुखद संकेत असा आहे की, हाच पॅटर्न कायम राहिला तर यंदा मान्सून वेळेवर येईल. पाऊसही चांगला पडेल.

बीएचयूमधील न्यूरोसायन्स विभागातील प्राध्यापक व्ही.एन. मिश्रा म्हणाले की, वाराणसीमध्ये फेब्रुवारीत प्रथमच गंगा नदी घाट सोडून ५० फुटांच्याही मागे सरकली आहे. साधारणत: हे दृश्य एप्रिलपर्यंत दिसायचे. यंदा उन्हाळा लवकर आला आहे.

उत्तराखंडात वसंत ऋतू आल्यानंतर मार्चच्या मध्यात बुरांशची फुले बहरायची. ती यंदा जानेवारीपासून बहरलेली आहेत. तसेच अक्रोडाच्या झाडावर मार्चच्या मध्यानंतर फुले यायची. यंदा मात्र जानेवारीतच अक्रोडाची झाडे फुलांनी बहरलेली आहेत.

बातम्या आणखी आहेत...