आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • These 12 Cities Of India Can Be Covered In 3 Feet Of Sea Water By 2100 Due To The Melting Of Glacier Report Presented By NASA; News And Live Updates

नासाचा भीतीदायक अहवाल:हिमनगाच्या वितळण्यामुळे भारतातील 12 शहरे 3 फुटांपर्यंत पाण्यात बुडतील; नासाने तयार केले 'सी लेव्हल प्रोजेक्शन टूल'

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • IPCC अहवालाचा हवाला देऊन इशारा

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे भारतातील विनाशाबद्दल भीती व्यक्त केली आहे. या अहवालात 80 वर्षांनंतर म्हणजेच 2100 पर्यंतचे भारताचे चित्र दर्शवण्यात आले आहे. समुद्राची पातळी वाढल्यामुळे भारतातील 12 किनारपट्टीची शहरे 3 फुटांपर्यंत पाण्यात बुडतील. दरम्यान, सततच्या उष्णतेमुळे ध्रुवांवर गोठलेले बर्फ वितळल्यामुळे हे घडेल असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे याचा सर्वात मोठा परिणाम भारतीय किनारपट्टीवर असलेल्या शहरांना बसेल. यामध्ये ओखा, मोरमुगाओ, कांडला, भावनगर, मुंबई, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, तुतीकोरन, कोची, पारादीप आणि पश्चिम बंगालच्या किद्रोपूर किनारपट्टी भागांचा समावेश आहे. अशावेळी भविष्यात तेथे राहणाऱ्या लोकांना ही जागा सोडावी लागू शकते असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

नासाने तयार केले सी लेव्हल प्रोजेक्शन टूल
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने समुद्रसपाटीच्या प्रक्षेपणाचे साधन तयार केले. या साधनामुळे समुद्रकिनाऱ्यावरील लोकांना आपत्तीपासून आवश्यक ती व्यवस्था करण्यात मदत होणार आहे. त्यासोबतच लोकांना वेळेत बाहेर काढण्यात यामुळे मदत मिळणार आहे. या ऑनलाइन साधनाद्वारे कोणीही भविष्यातील आपत्ती म्हणजेच समुद्राची वाढती पातळी जाणून घेऊ शकणार आहे.

IPCC अहवालाचा हवाला देऊन इशारा
नासाने इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंजच्या (IPCC) अहवालाचा हवाला देत जगभरातील अनेक शहरे पाण्याखाली बुडतील असा इशारा दिला आहे. आपीसीसीने हा 6 वा मूल्यांकन अहवाल असून 9 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आले होते. हा अहवाल हवामान प्रणाली आणि हवामान बदलाचा अधिक चांगला दृष्टिकोन देतो.

पुढील शतकापर्यंत जगातील अनेक देशांचे क्षेत्र कमी होईल.
पुढील शतकापर्यंत जगातील अनेक देशांचे क्षेत्र कमी होईल.

समुद्रासह मैदानावरही विनाश होईल
अहवालाच्या मते, वर्ष 2100 पर्यंत जगाच्या तापमानात लक्षणीय वाढ होईल. याप्रसंगी लोकांना भयंकर उष्णता सहन करावी लागेल. जर कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण थांबवले नाही तर तापमान सरासरी 4.4 डिग्री सेल्सियसने वाढेल. दरम्यान, पुढील दोन दशकात तापमानात 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढ होईल. जर पारा इतक्या वेगाने वाढला तर हिमनद्याही वितळतील आणि यामुळे हे पाणी मैदानी आणि समुद्री भागात विनाश घेऊन येईल.

बातम्या आणखी आहेत...