आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदानीवरुन मतभेद:हिंडेनबर्ग प्रकरणी काेर्ट समिती योग्य पर्याय - शरद पवार; हे राष्ट्रवादीचे स्वतंत्र विचार आहेत- काँग्रेस

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवाल प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाची समिती योग्य पर्याय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, याप्रकरणी जेपीसीची मागणी करणे निरुपयोगी आहे. कारण जेपीसीमध्ये सत्ताधारी पक्षाचे बहुमत असते आणि त्यामुळे सत्यता समोर येऊ शकली नसती.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले, ‘विरोधकांनी एका कंपनीकडून देण्यात आलेल्या अहवालास गरजेपेक्षा अधिक महत्त्व दिले. या कंपनीची पार्श्वभूमी कुणालाच माहीत नाही. आम्ही हे नावही ऐकले नाही. याप्रकरणी एका औद्योगिक समूहाला टार्गेट करण्यात आले आहे असे वाटते.’ जेपीसीमार्फत चौकशीच्या विरोधकांच्या मागणीवरून शरद पवार म्हणाले, ‘जेपीसी स्थापन केल्याने तिढा सुटणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या समितीद्वारे सत्यता समोर येईल.’

समान विचारधारेच्या १९ पक्षांची एकजूट
पवारांच्या वक्तव्याबाबत काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश म्हणाले, हे राष्ट्रवादीचे ‘स्वतंत्र विचार’ असू शकतात, पण पंतप्रधानांशी संबंधित अदानी समूहाचा मुद्दा सत्य व अत्यंत गंभीर आहे, याची खात्री समान विचारधारा असलेल्या १९ विरोधी पक्षांना आहे.