आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकरांवरून राजकारण सुरू:...तर हे लोक गांधींऐवजी सावरकांना राष्ट्रपिता बनवतील; असदुद्दीन ओवेसींचे राजनाथ सिंह आणि मोहन भागवतांवर त्रिकास्त्र

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून भारतात राजकारण चांगलेच पेटत आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सावरकरांवर भाष्य केले होते. त्यावर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टीकास्त्र सोडले आहे. समाजात सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरु आहे. असे वक्तव्य सिंह यांनी केले होते.

त्यावर ओवेसी यांनी म्हटले आहे की, "इतिहासासोबत छेडछाळ करून वेगळ्या पद्धतीची माहिती जगासमोर आणण्याचे काम सुरु आहे. जर अशीच स्थिती राहिली तर ते महात्मा गांधीना विसरून सावरकरांनाच देशाचा राष्ट्रपिता म्हणून घोषित करायला बसले." असे म्हणत ओवेसींनी राजनाथ सिंह आणि मोहन भागवतांवर निशाणा साधला.

ओवेसी पुढे म्हणाले की, 'सावरकरांनी तुरुंगातून बाहेर येण्यासाठी स्वत: ब्रिटीशांना दया याचिकेचे पत्र लिहले होते. सावरकर यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटमध्ये शामील असल्याचा देखील आरोप होता. असे स्वत: जस्टिस जीवन लाल कपूर म्हणाले होते' असे ओवेसी म्हणाले.

सावरकरांची मोठ्या प्रमाणात बदनामी

'वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन' या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात निमित्ताने सिंह आणि भागवत बोलत होते. त्यावेळी भागवत म्हणाले होते की, सावरकर यांच्या विषयी बऱ्याच जणांनी खोटी माहिती पसरवली आहे. त्यामुळे सत्य घटना, माहिती लोकांना माहिती नाही. सावकर यांच्यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद आणि योगी अरविंद यांना देखील बदनाम करण्याचा कट काही जण करत आहेत. कारण सावरकर या तिन्ही महान व्यक्तीच्या विचाराशी सहमत होते.

याच कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील सावकरांवर आपले भाष्य केले, ते म्हणाले की, "सावरकरांनी तुरुंगात असतांना गांधीजींच्या म्हणण्यावरून त्यांनी दया याचिका ब्रिटीशांकडे दाखल केली होती. कारण गांधींचे असे म्हणणे होते की, सामान्यत कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली आणि महात्मा गांधींनी सावरकरजींची सुटका करावी असे आवाहन केले होते. ते म्हणाले होते की, ज्या प्रकारे आम्ही स्वातंत्र्यासाठी आंदोलन शांततेने चालवत आहोत, तसे सावरकरही करतील.

सावरकरांनी लोकांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीची बेडी तोडण्यासाठी प्रेरित केले तसेच स्त्रियांच्या हक्कांसह इतर सामाजिक समस्यांमध्ये अस्पृश्यतेविरोधात आंदोलनेही केली. मात्र, देशाच्या सांस्कृतिक एकतेमध्ये त्यांच्या योगदानाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात आले आहे. 2003 मध्ये संसदेत सावरकरांचे चित्र लावले जात होते तेव्हा बहुतेक राजकीय पक्षांनी त्यावर बहिष्कार घातला. असे सिंह म्हणाले होत, त्यावर आता राजकारण सुरु झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...