आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Third Break Of Monsoon; Impossible To Make Up For 9 Per Cent Deficit In Rainfall; News And Live Updates

हवामान:मान्सूनचा तिसरा ब्रेक; पावसातील 9 टक्के तुटीची भरपाई होणे अशक्य; 27 ऑगस्टपर्यंत कमी पावसाची शक्यता, ही तूट आणखी वाढेल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
 • कॉपी लिंक
 • मोठ्या व वारंवार येणाऱ्या ब्रेकमुळे कमी पाऊस : स्कायमेट

देशातील काही भाग वगळता इतर भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे. मान्सूनमध्ये आतापर्यंत ९% कमी पाऊस झाला आहे. २४ ऑगस्टपर्यंत ६६०.२ मिमी पावस व्हायला हवा होता, मात्र ५९८.५ मिमी पाऊस झाला आहे. आता मान्सूनने या हंगामातील तिसरा ब्रेकही घेतला आहे. यामुळे पुढील तीन दिवस सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस होईल, म्हणजे पावसातील तुटीची भरपाई होण्याची शक्यता कमी हाेत चालली आहे. आता मान्सून सामान्य राहण्याची शक्यता घटली आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) ३१ ऑगस्टला सुधारित पूर्वअंदाज जाहीर करेल, तर खासगी हवामान संस्था स्कायमेटने त्यांच्या पूर्वअंदाजात बदल करत म्हटले आहे की, ३० सप्टेंबरपर्यंत संपणाऱ्या मान्सूनदरम्यान या वेळी देशात ६ टक्के पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आधी यंदा सरासरी पावसाचा अंदाज होता.

मोठ्या व वारंवार येणाऱ्या ब्रेकमुळे कमी पाऊस : स्कायमेट
स्कायमेटचे शास्त्रज्ञ महेश पलावत यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये आतापर्यंत ९१% पाऊस झाला आहे. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात जुलैच्या पहिल्या दिवसापर्यंत मान्सून ब्रेक होता, नंतर ऑगस्टमध्येही मान्सून ब्रेक राहिला आणि आता तिसऱ्यांदा चार-पाच दिवसांचा ब्रेक सुरू झाला आहे. म्हणून आता मान्सूनच्या रिकव्हरीची शक्यता कमी दिसत आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये शंभर टक्के पावसाची शक्यता आहे. मात्र एकूण ६% ची तूट राहण्याची चिन्हे आहेत. यात ४% कमी वा जास्त होण्याची शक्यता आहे. गुजरात, राजस्थान, पंजाब, ओडिशा, केरळमध्ये मोठ्या तुटीसोबत मान्सून पूर्ण होईल. बिहार, पूर्व यूपी, मध्य प्रदेशात सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.

राज्यनिहाय पावसाची स्थिती

 • राज्य पाऊस
 • गुजरात - 47%
 • ओडिशा - 31%
 • जम्मू-काश्मीर - 28%
 • केरळ - 28%
 • पंजाब - 21%
 • हिमाचल - 20%
 • छत्तीसगड - 17%
 • उत्तराखंड - 7%
 • राजस्थान - 6%
 • उत्तर प्रदेश - 5%
 • मध्य प्रदेश - 3%
 • झारखंड - 3%
 • गोवा - 2%

या राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस

 • तेलंगणा 21%
 • तामिळनाडू 29%
 • आंध्र प्रदेश 17%
 • हरियाणा 16%
 • पश्चिम बंगाल 6%
 • महाराष्ट्र 5%
 • कर्नाटक 1%

कमी दाबाचे पट्टे ५०%पेक्षाही कमी झाले, यामुळे कमी झाला पाऊस : आयएमडी
आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, मान्सूनमध्ये सर्वाधिक पाच कमी दाबाचे पट्टे ऑगस्टमध्ये होत असतात. या वेळी फक्त दोनदा झाले. एक ओडिशातून आला तर दुसरा बांगलादेशातून. यामुळे चांगला पाऊस होऊ शकला नाही. फक्त ५-६ दिवस पाऊस झाला. पुढचा कमी दाबाचा पट्टा ६ सप्टेंबरच्या आसपास बंगालच्या खाडीत बनू शकतो.

बातम्या आणखी आहेत...