आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लस अपडेट:पन्नाशीच्या वरील 27 कोटी लोकांना देणार डोस, लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्चपासून : डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. यात ५० वर्षांहून अधिक व ५० हून कमी वय असलेले, परंतु गंभीर आजारी असलेल्यांना लस दिली जाईल. पन्नाशीवरील सुमारे २७ कोटी लोक देशात असतील, असा सरकारचा अंदाज आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. दुसऱ्या टप्प्यात दोन कोटींहून अधिक फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जात असल्याने तिसऱ्या टप्प्याची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. देशात ७ लसींची चाचणी सुरू असून यातील ३ चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.

आतापर्यंत २२ देशांनी भारताकडे लसीची मागणी केली असून यातील १५ देशांना पहिली खेप पोहोचली आहे. आता भारतात दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाची तयारी सुरू असताना या देशांतही असा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.

देशात शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकूण ५२.९ लाख लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. भारताला ५० लाखांचा आकडा पूर्ण करण्यास २१ दिवस लागले, तर सर्वाधिक २.७९ कोटी डोस दिलेल्या अमेरिकेला ५० लाखांचा आकडा ओलांडण्यासाठी २४ दिवस लागले होते. ब्रिटनमध्ये ४३ तर इस्रायलमध्ये ४५ दिवस लागले होते. सर्वाधिक डोस देण्याबाबतीत भारताचा टॉप-५ देशांत समावेश झाला आहे.

देशात कोरोनामुळे १७४ डॉक्टर, ११६ परिचारिका, १९९ आरोग्य कर्मचाऱ्यांचा झाला आहे मृत्यू
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी लोकसभेत सांगितले की, देशात कोरोनामुळे एकूण १७४ डॉक्टर, ११६ नर्स आणि १९९ आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविरुद्ध सुरू असलेली लढाई पाहता देशात एकूण ४०,३११ व्हेंटिलेटर, १५.१७ लाख आयसोलेशन बेड आणि ७९,३८६ आयसीयू बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...