आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Third Wave Of Corona Prepared To Save 'future Of The Country' From Third Wave Of Corona, Data Sought From Every State For 22 Devices Used To Treat Children Including ICU; News And Live Updates

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती:या लाटेचा मुलांवर होऊ शकतो मोठ्या प्रमाणावर परिणाम; बाल आयोगाने प्रत्येक राज्यातील आयसीयूसह 22 उपकरणांचा मागितला डेटा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयोगाने राज्यांकडून कोणत्या आकडेवारीची मागणी केली?

देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरसह अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. यामुळे आरोग्य यंत्रनेवर प्रचंड ताण आलेले आहे. यातच आता तज्ञांकडून कोरोनाच्या तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे देशातील 35 टक्के लोक तिसऱ्या लाटेच्या विळ्याख्यात येत असून याचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बाल आयोगाने प्रत्येक राज्यांतील आयसीयू बेडसह 22 उपकरणांचा डेटा मागितला आहे.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) प्रत्येक राज्यांना लहान मुलांसाठी आरोग्याच्या पायाभूत सुविधांची आकडेवारी एका आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 'आरोग्याच्या पायाभूत सुविधांची काय स्थिती आहे, हे दुसर्‍या लाटेदरम्यान सर्वांसमोर आले आहे. त्यामुळे देशात सध्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेची मोठी समस्या आहे. विद्यमान पायाभूत सुविधा देखील पूर्णपणे कार्यरत नसल्याचे एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले की, वैद्यकीय यंत्रणेत तांत्रिक तंत्रज्ञांची कमतरता आणि निष्काळजी वृत्तीमुळे दुसऱ्या लाटेत कोरोनाचे नवीन प्रकरणे वाढले आहे.

आयोगाने राज्यांकडून कोणत्या आकडेवारीची मागणी केली?
1. नियोनेटल इंटेंसिव्ह केयर यूनिट - एनआयसीयू (0 ते 28 दिवसांच्या मुलांसाठी)

2. सिक न्यू बार्न केअर युनिट- एसएनसीयू (जर आजार 28 दिवसांच्या आत उद्भवला असेल तर)

3. पीडियाट्रिक इंटेंसिव्ह केयर यूनिट-पीआईसीयू (0-18 वर्ष वयोगटातील) सद्यस्थितीत किती आहे आणि किती घेतल्या.

4. जर एखादा मुल गंभीर स्थितीत रुग्णालयात आला तर किती बेड कार्यरत आहेत.

5. सध्या मुलांसाठी किती रुग्णवाहिका कार्यरत आहेत.

6. दरम्यान, मुलांसाठी डॉक्टर निवासी आहेत आणि किती डॉक्टरांना कॉलवर बोलवता येईल.

7. सध्या किती पॅरा वैद्यकीय कर्मचारी आहेत.

8. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर, नेब्युलायझर, ऑक्सिमीटर, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, रेडियंट वॉर्मर, बॅसिनेट, प्लॅथीरापी, लॅरींगोस्कोपी, सक्शन पंप, ऑक्सिजन सिलिंडर यासह 22 उपकरणांची यादी...

बातम्या आणखी आहेत...