आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Third Wave Of Coronavirus Alert; IMA Update | Indian Medical Association To Narendra Modi And State Governments; News And Live Updates

कोरोनावर आयएमएचा इशारा:मेडिकल असोसिएशन म्हणाले - कोरोनाची तिसरी लाट जवळ; पर्यटन आणि धार्मिक यात्रेला आणखी काही महिने थांबवले जाऊ शकते

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोक गर्दी करत आहे ही खेदाची बाब - आयएमए

देशात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने कोरोनावर इशारा दिला आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट लवकर येणार आहे. यामुळे पर्यटन आणि धार्मिक यात्रेंवर आणखी काही महिन्यांसाठी पुढे ढककले जाऊ शकते असे आयएमएने दिला आहे. ही इशारा तेंव्हा आला आहे जेंव्हा देशातील काही भागात अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे. पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.

देशातील कोरोनाची दुसरी लाट नुकतीच कमी होताना दिसत आहे. यामुळे देशातील लोकांनी आनंद व्यक्त करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे येत्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशातील धार्मिक यात्रा आणि पर्यटन स्थळांवर काही महिन्यांसाठी बंदी घातली जावी अशी आयएमएचे इच्छा आहे.

लोक गर्दी करत आहे ही खेदाची बाब - आयएमए
देशात अनेक ठिकाणी अनलॉक होत असल्यामुळे लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. ही गर्दी खेदाची बाब असल्याचे आयएमएने प्रेस रिलीज करत म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, जगात आतापर्यंत आलेल्या महामारीवरुन हे लक्षात येते की कोणतीही तिसरी लाट टाळता येणार नाही. कोरोना नियमांचे पालन करण्यात जनता आणि सरकार दोन्हीही निष्काळजी असल्याचे आयएमएने म्हटले आहे.

लसीकरणामुळे कमी होईल तिसरी लाट
कोरोना महामारीला रोखायचे असेल तर लसीकरण एकमेव पर्याय आहे. कारण लसीकरणामुळे कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तिसरी लाट कमी करण्यासाठी आपल्याला कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील दोन तीन महिने कोणताच धोका पत्करु नये असे आयएमएचे अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...