आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Is How Women Commandos Happen..no Time To Sleep, If There Is A Jump, You Have To Drill Hard.

प्रेरक:महिला कमांडाे अशा घडतात..झोपण्यासाठी वेळ नाही, झाेप आली तर खडतर ड्रील करावे लागते

संदीप कौशिक | पंचकुला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झोपेसाठी केवळ २ तास. भोजनासाठी २० ते ३० मिनिटे. कधी दोरखंडाने शिखर किंवा इमारतीची चढाई, तर कधी खाईत उडी मारणे. कोमल शरीराला तापवून तप्त लोह बनवले जाते. १४ महिलांनी आयटीबीपी (पंचकुला) येथे सलग ४२ दिवस अत्यंत खडतर कमांडो प्रशिक्षण पूर्ण केले. आयटीबीपीच्या सर्वात जुन्या प्रशिक्षण केंद्रात (बीटीसी) भानूमध्ये पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबल हायकमांडो प्रशिक्षण यशस्वी झाले. आयजी ईश्वरसिंह दुहन म्हणाले, महिलांची ही चौथी बॅच होती. तीन बॅचमध्ये कोणत्याही महिलेला यश मिळाले नव्हते. चौथ्या बॅचमध्ये २१ महिला होत्या. पैकी १४ कॉन्स्टेबललाच हे साध्य झाले. सर्वात आव्हानात्मक होते. जंगल ट्रेनिंग. ते चार दिवसांचे होते. त्यात चोवीस तास खुल्या आकाशाखाली डोळ्यात तेल घालून सतर्क राहावे लागले. सहा आठवड्यांचे हे प्रशिक्षण असते. विश्रांती मुळीच नसते. दिवसभरात जेवणासाठी केवळ २५ ते ३० मिनिटे मिळतात. मैदानावर सतत व्यग्र ठेवले जाते. रात्रीही जागे राहावे लागते. अनेकदा रात्री अडीचला झोपण्यासाठी गेल्यानंतर पहाटे चार वाजता उठवले जाते. त्यातही पहिले चार आठवडे परीक्षा घेणारे ठरतात. पहिल्या आठवड्यात विना शस्त्र स्वयंसुरक्षा शिकवली जाते. १५ किलोमीटर धावावेही लागते. दुसऱ्या आठवड्यात डोंगर, इमारतींची चढाई असते. उंचावरुन उतरण्याचेही प्रशिक्षणही दिल्या जाते. तिसऱ्या आठवड्यात सशस्त्र प्रशिक्षण दिले जाते. रायफल शुटिंगमध्ये अचूक निशाणा शिकवला जातो. चौथ्या आठवड्यापासून दडवलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन ते नष्ट करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सर्वात शेवटी जंगल एक्सर्साइसचा समावेश होतो. त्यात पाण्यातून बाहेर पडणे, जखमी सहकाऱ्याला घेऊन चालणे हे शिकवले जाते. पाचव्या आणि सहाव्या आठवड्यात बुद्धीशी संबंधित काही सत्रे, अंतर्गत सुरक्षेचेही प्रशिक्षण दिले जाते.

बौद्धिक पातळी मजबुतीसाठी व्याख्यान रात्रीच्या वेळी झोपू दिले जात नाही. परंतु झोप आवरत नाही तेव्हा त्यांना टास्क दिले जाते. तेही कठीण. मानसिक पातळीवर फीट ठेवण्यासाठी आधी शारीरिक पातळीवर बळकट केले जाते. शरीराचे संकेत मिळाल्यावर बौद्धिक पातळीवर मजबूत करणारे ड्रिल करावे लागतात. साप्ताहिक सत्रात व्याख्यानाद्वारे प्रोत्साहन दिले जाते.

बातम्या आणखी आहेत...