आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • This Is My Last Election, The Emotional Appeal Of The Chief Minister To The People On The Last Day Of The Campaign

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नीतीश कुमारांचे इमोशनल कार्ड:'ही माझी अखेरची निवडणूक आहे', प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्याचे जनतेला भावनिक आवाहन

पाटणा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी गुरुवारी एका प्रचारसभेत म्हटले की, ही त्यांची अखेरची निवडणूक आहे. हा त्यांचा निर्णय आहे, का इमोशनल कार्ड याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

पूर्णियाच्या धमदाहा विधानसभा क्षेत्रात प्रचाराच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी जनतेला संबोधित करताना नीतीश कुमार म्हणाले की,‘आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे. ’ यानंतर नीतीश यांनी धमदाहावरुन निवडणूक लढणाऱ्या लेसी सिंह यांनाव विजयी करण्याची अपील केली. बिहारमध्ये 7 नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यातील 78 जागांसाठी मतदान होणार आहे. 10 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

विरोधकांसमोर मोठे आव्हान

जदयू प्रवक्ते राजीव रंजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सत्तेत येण्याची प्रतीक्षा करणाऱ्या विरोधकांसमोर मुख्यमंत्र्यांनी मोठी रेघ तयार केली आहे. मुख्यमंत्र्यांनी नेहमी एखाद्या संन्यास्याप्रमाणे कोणत्याही आपेक्षेशिवाय राजकारण केले. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.