आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Is Not Valor; Railway Property Worth Rs 1,000 Crore Destroyed, Rs 12 Lakh Canceled, 1.5 Lakh Passengers Stranded

विचार करा...:हे शौर्य नव्हे; हजार कोटींच्या रेल्वे मालमत्तेची नासधूस,12 लाखांचा प्रवास रद्द, 1.5 लाख प्रवासी अडकले

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ४ दिवसांपासून अग्निवीर योजनेवर देशातील अनेक भागांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये रेल्वेवर सर्वाधिक निशाणा साधला. यामुळे रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांचा रिफंड मिळून एकूण १ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसानीची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर १२ लाख लोकांना प्रवास रद्द करावा लागला. ९२२ मेल एक्स्प्रेस ट्रेन रद्द झाल्या. १२० मेल ट्रेन अंशत: रद्द केल्या. दीड लाख प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात रेल्वे सोडावी लागली. ५ लाखांपेक्षा जास्त पीएनआर रद्द झाले. सुमारे ७० लाख रु.चा प्रवाशांना रिफंड दिला. पूर्व मध्य रेल्वे झोनला २४१ कोटी संपत्तीचे नुकसान झाले. आंदोलकांनी ज्या संपत्तीला निशाणा साधला, त्यात कोट्यवधी करदात्यांची कमाई गुंतली आहे.

हिंसाचार चुकीचा : उद्योगपतींचे मत : महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा, आरपीजी एंटरप्रायझेसचे चेअरमन हर्ष गोएंका,बायोकॉनच्या चेअरपर्सन किरण मजुमदार शॉ यांनी अग्निपथ योजनेचे समर्थन करत सांगितले की, प्रशिक्षित तरुणांसाठी कॉर्पोरेट जगतात रोजगाराच्या संधी आहेत. त्यांनी हिंसाचार चुकीचा ठरवला.

अधिसूचना जारी; दिसंबरपासून ट्रेनिंग : अग्निवीरांची स्वतंत्र रँक असेल. त्यांना डीए, पीएफ आणि ग्रॅच्युइटी मिळणार नाही. लष्कर भरती ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर २२ मध्ये होईल. २५ हजार तरुणांची डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात प्रशिक्षण होईल. दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण २३ फेब्रुवारी २३ च्या आसपास सुरू होईल. हवाई दल २४ पासून नोंदणी आणि २४ जुलैपासून ऑनलाइन परीक्षा सुरू करेल. प्रशिक्षण ३ डिसेंबर पासून होईल.

इंजिन १२ कोटी, एसी कोच २.५ कोटी रु.चा आहे

रेल्वेला कसे नुकसान झाले?
चार दिवसांत देशभरात ९२२ मेल एक्स्प्रेस रेल्वे रद्द झाल्या. एका पीएनआरवर ३ प्रवासी धरल्यास एकूण ५ लाखांपेक्षा जास्त पीएनआर रद्द झाल्या आहेत. प्रत्येक रेल्वेत सरासरी १२०० ते १५०० पर्यंत प्रवासी जातात. यामुळे सुमारे १२ लाखांचा प्रवास रद्द झाला. रेल्वे मंत्रालयाने उदाहरण देत सांगितले की, एका प्रवाशाचे कमीत कमी भाडे ६०० रु. ग्राह्य धरल्यास एकूण ७० कोटींचा रिफंड दिला जात आहे. यामध्ये एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसीच्या भाड्याचा समावेश केल्यास रिफंड १०० कोटींचा होईल. ८२७ पॅसेंजर ट्रेन रद्द झाल्या. १२० मेल एक्स्प्रेस रेल्वे अंशत: रद्द झाल्या. यामुळे दीड लाख प्रवाशांना रेल्वे सोडून प्रवास रद्द करावा लागला.

एका रेल्वेचा खर्च किती येतो? मेल एक्स्प्रेस २४ डब्यांची असते. इंजिन १२ कोटी रुपयांचे असते. एसी डबा अडीच कोटी, स्लीपर जनरल कोच २ कोटी रुपयांचा. एक रेल्वे ३० कोटी रुपयांत पडते. आंदोलनात २१ रेल्वे जाळण्यात आल्या.

यूपीत सार्वजनिक संपत्तीचे नुकसान सर्वात जास्त
नवी दिल्ली | अग्निपथ योजनेविरोधात १९ राज्यांत आंदोलन पोहोचले आहे. या दरम्यान, यूपी-बिहारमध्ये सार्वजनिक संपत्तीचे सर्वाधिक नुकसान झाले. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०२० च्या अहवालानुसार, अशा प्रकरणांत २८% पर्यंत घट आली होती. यूपी-बिहारसह ६ राज्यांत प्रकरणे वाढली आहेत. गुन्ह्यांच्या संख्येत यूपी(२२१७) सर्वात वर तर तामिळनाडू(६६८) दुसरा आहे.

येथे प्रकरणांत वाढ राज्य 2019 2020 यूपी 2,107 केस 2,217 झारखंड 170 211 बिहार 96 100 मेघालय 17 23 पंजाब 35 70 काश्मीर 284 317 प्रकरणे सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानीची.

कारवाई; यूपीत २७ दंगेखोरांकडून १२.९७ लाख रु. वसूल करणार
अग्निपथच्या विरोधात काशीत ३६ वाहनांची तोडफोड करणाऱ्या २७ जणांकडून जिल्हा प्रशासन १२.९७ लाख रु. वसूल करणार आहे.

अग्निवीर : ३० दिवस सुटी, विशेष भत्ते मिळतील
नवी दिल्ली - लष्करभरतीच्या अग्निवीर योजनेवरून सुरू असलेले आंदोलन आणि भारत बंदच्या वृत्तांमध्ये लष्कराने सोमवारी अग्निवीर भरतीची अधिसूचना जारी केली. अधिसूचनेनुसार, पोस्टिंगच्या ठिकाणानुसार अग्निवीरांना सैनिकांप्रमाणे विशेष भत्ता मिळेल. माजी अग्निवीरांसाठी कँटीन आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतील. आज तीन दलांचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...