आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

तयारी:यंदा मालाबार नौदल युद्ध सरावात प्रथमच ऑस्ट्रेलिया, कुरापतखोर चीनला घेरण्याची भारताने केली जय्यत तयारी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • मालाबार नौदल युद्ध सराव भारत, अमेरिका, जपानच्या नौदलादरम्यान दरवर्षी आयोजित केला जातो

यंदा मालाबार नौदल युद्ध सरावात ऑस्ट्रेलियाचाही सहभाग असेल. भारत लवकरच ऑस्ट्रेलियाला याचे निमंत्रण पाठवेल. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, पुढील आठवड्यापर्यंत औपचारिकरीत्या निमंत्रण देण्याची परवानगी मिळेल. मालाबार नौदल युद्ध सरावात भारतासोबत अमेरिका आणि जपानही सहभागी होऊ शकतात.

२०१६ पासूनच ऑस्ट्रेलियाने या युद्ध सरावात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, चीनसोबतच्या संबंधांमुळे भारताने अजूनपर्यंत ऑस्ट्रेलियाला या नौदलाच्या सरावात सहभागी करणे टाळले आहे. पूर्व लडाख आणि इतर भागात सीमेवर चीनचा हस्तक्षेप पाहता भारताने आता धोरण बदलले आहे. अनौपचारिकरीत्या बनवलेल्या क्वॉड ग्रुपला यामुळे प्रथमच लष्करी मंचावर एकत्र पाहता येईल. क्वॉड ग्रुपमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान व अमेरिकेचा सहभाग आहे. मालाबार सरावाच्या माध्यमातून हिंदी महासागरात पाय पसरणाऱ्या चीनला अटकाव करणे हा उद्देश आहे.

काय आहे मालाबार सराव?

मालाबार नौदल युद्ध सराव भारत, अमेरिका, जपानच्या नौदलादरम्यान दरवर्षी आयोजित केला जातो. याची सुरुवात भारत आणि अमेरिकेने १९९२ मध्ये द्विपक्षीय नौदल सरावाच्या रूपाने केली होती. २०१५ मध्ये यात जपानलाही सामील करण्यात आले.

0