आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Is The Sankalp Yatra Of Freedom From The Mentality Of Slavery, Asserted By Prime Minister Narendra Modi

कर्तव्यपथचे दिल्लीत उद्घाटन:ही गुलामीच्या मानसिकतेतून स्वातंत्र्याची संकल्प यात्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी सायंकाळी ‘कर्तव्यपथ’चे उद्घाटन केले. इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत २.५ किलोमीटर लांबीच्या राजपथचे नामकरण एक दिवस आधीच करण्यात आले होते. मोदी म्हणाले, राजपथामागची भावना गुलामीचे प्रतीक होती. आज राजपथचे अस्तित्व संपुष्टात येऊन तो कर्तव्यपथ बनला आहे.

जॉर्ज पंचम यांच्या जागी नेताजींचा पुतळा उभा आहे. हे गुलामीच्या मानसिकतेच्या त्यागाचे पहिले उदाहरण नाही. ना ही सुरुवात आहे ना अंत. गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याचे उद्दिष्ट प्राप्त करेपर्यंत निरंतर चालणारा हा प्रवास आहे. कर्तव्यपथावर लाल ग्रॅनाइटचा १५.५ किमी पादचारी पथ बनला आहे. शेजारी १९ एकरांत नहर आहे. त्यावर १६ पूल बनवले अाहेत. ३.९० लाख चौरस मीटरवर हिरवळ आहे. शुक्रवारपासून हे जनतेसाठी खुले होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी कर्तव्यपथ उभारणाऱ्या कामगारांची भेट घेतली. कामगारांना प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या संचलनासाठी पाहुणे म्हणून निमंत्रण दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...