आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Moment After 500 Years: Bhumi Pujan Begins In Ayodhya With The Praise Of Rama's Goddess!

अयोध्येत नवे पर्व:500 वर्षांनी हा क्षण : रामाच्या कुलदेवीच्या स्तुतीसह अयाेध्येत भूमिपूजनाचा श्रीगणेशा!

अयोध्या3 वर्षांपूर्वीलेखक: विजय उपाध्याय
  • कॉपी लिंक
अयोध्येत सकाळी ९ वाजता भूमिपूजन सुरू झाले तेव्हा राजघराण्याचे वंशज विमलेंद्र मोहनप्रताप मिश्र यांनी सकाळी भगवान श्रीरामाची कुलदेवता देवकालीची पूजा सुरू केली. विमलेंद्र राम मंदिर तीर्थचे विश्वस्त आहेत. - Divya Marathi
अयोध्येत सकाळी ९ वाजता भूमिपूजन सुरू झाले तेव्हा राजघराण्याचे वंशज विमलेंद्र मोहनप्रताप मिश्र यांनी सकाळी भगवान श्रीरामाची कुलदेवता देवकालीची पूजा सुरू केली. विमलेंद्र राम मंदिर तीर्थचे विश्वस्त आहेत.
  • अयोध्या आणखी सुंदर होईल, रोजगारही मिळेल : अन्सारी

५०० वर्षांची प्रतीक्षा, आंदोलन आणि कायदेशीर लढ्यानंतर सोमवारपासून राम मंदिर उभारणीचे पूजन सुरू झाले. राम जन्मभूमीवर पूजेच्या प्रारंभासह श्रीरामाची कुलदेवता देवकाली मंदिरातही पूजा सुरू झाली. दोन्ही जागी ३ दिवसांपर्यंत विशेष पूजा होईल. जन्मस्थळी पूजेआधी वैदिक परंपरेनुसार २१ आचार्यांच्या दलाने सकाळी ९ वाजता आसन ग्रहण केले. पहिल्या दिवसाच्या पूजेचे यजमान कोलकात्याचे विहिंपचे कार्यकर्ते महेश भागचंदका दांपत्य होते. काशीचे आचार्य जयप्रकाश त्रिपाठींच्या नेतृत्वात आचार्यांनी सर्वप्रथम गणेश अथर्वशीर्षाचे पठण सुुरू केले. ही आराधना अथर्ववेदातून घेतलेली आहे. वैदिक पूजन सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत चालले.

५ ऑगस्टला भूमिपूजनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी हनुमानगढी मंदिरात जातील. सोमवारी मंदिर सॅनिटाइझ करण्यात आले. पुजारी राजू दास म्हणाले, हनुमानाविना रामाचे कोणतेही कार्य सुरू होत नाही यामुळे मोदी व मुख्यमंत्री योगी आधी हनुमानगढीत येत आहेत. ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, आम्ही ‘मंदिर आरंभ पूजन’ संबोधत आहोत. हा शिलान्यास नाही. शिलान्यास १९८९ मध्येच झाला आहे.

अयोध्या आणखी सुंदर होईल, रोजगारही मिळेल : अन्सारी
भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण बाबरी मशिदीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारींना पाठवले आहे. ते म्हणाले, ‘पहिले निमंत्रण मला िमळावे ही भगवान श्रीरामांचीच इच्छा होती. मी त्याचा स्वीकार करतो. जेव्हा मंदिर उभारले जाईल तेव्हा अयोध्या आणखी सुंदर होईल. रोजगारही मिळेल.’

- आदित्यनाथांनी ४-५ ऑगस्टला देशभरातील भाविकांना दिव्यांची आरास व रामचरितमानसचे पठण करण्याचे आवाहन केले आहे.
- सोहळ्यात उमा भारती व कल्याण सिंह सहभागी होऊ शकणार नाहीत.
- सोमवारी मुस्लिम पक्षालाही सुवार्ता मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांनी मशिदीसाठी राखीव ५ एकर जमीन वक्फ बोर्डाकडे सोपवली आहे.

अयोध्या द. कोरियाच्या १०% लोकसंख्येसाठी आजोळ, मात्र कोरोनामुळे निमंत्रण नाही
दक्षिण कोरियाचे ६० लाख लोक, म्हणजे १०% लोकसंख्या अयोध्येला आपल्या आजीचे घर मानते. तेथील कारक राजवंशानुसार हे राजघराणे सुरू करणारी राणी हौ व्हांग-ओक अयोध्येची राजकुमारी सूरीरत्ना होती.

बिबुध बिप्र बुध ग्रह चरन बंदि कहउँ कर जोरि।
होइ प्रसन्न पुरवहु सकल मंजु मनोरथ मोरि।।

अर्थात्... देवता, ब्राह्मण, पंडित, ग्रह या सर्वांच्या चरणांची वंदना करून हात जोडून सांगतो की, तुम्ही प्रसन्न होऊन माझे सर्व सुंदर मनोरथ पूर्ण करावे.

बातम्या आणखी आहेत...