आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यदिन:मास्क, डिस्टन्सिंगसह साजरा होणार यंदा स्वातंत्र्य दिन... किल्ल्याच्या दोन्ही बाजूंनी 150 पाहुणे असतील... पूर्वी 300 ते 500 पाहुणे असत

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेरोनामुळे जवान चार रांगांत उभे असतील व फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करतील

राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाची तयारी जोरात सुरू आहे. गुरुवारी जवानांनी लाल किल्ल्यावर फुल ड्रेस रिहर्सल केली. हा सराव सुरू असताना पावसाने हजेरी लावली होती, तरीही सुरक्षा दलांचा उत्साह कायम होता. मुसळधार पावसातही सैनिकांनी सराव पूर्ण केला. कोरोना संकटामुळे यंदा १५ ऑगस्टची विशेष तयारी करण्यात आली. यंदा पाहुण्यांच्या संख्येत कपात करण्यात आली. सोबतच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी लोकांची आसन व्यवस्था त्या दृष्टीने तयार करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी यंदा ओपन पास मिळणार नाहीत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. त्याशिवाय लोकांची बैठक व कार्यक्रम स्थळाच्या सुरक्षा व्यवस्थेतदेखील बदल करण्यात आला आहे.

  • किल्ल्याच्या दोन्ही बाजूंनी १५० पाहुणे असतील. पूर्वी ३०० ते ५०० पाहुणे असत.
  • अनेक व्हीआयपी फोरग्राउंडमध्ये खुर्च्यांवर बसतील.
  • तिन्ही दलांचे जवान पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देतील. त्यात सुमारे २२ जवान व अधिकारी असतील. राष्ट्रीय सलामीत ही संख्या ३२ असेल.
  • काेरोनामुळे जवान चार रांगांत उभे असतील व फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करतील.
बातम्या आणखी आहेत...