आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्षांचे नेते अडचणीत:या वर्षी तपास यंत्रणांनी आवळला 15 नेत्यांविरुद्ध कारवाईचा फास; सोनिया, राहुल गांधींचाही समावेश

नवी दिल्ली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणात आम्ही घाबरणारे नाही, असे टीआरएसचे नेते म्हणत असले तरी ज्यांचे आणखीही काही ‘उद्योग’ सुरू आहेत ते आमदार मनातून घाबरलेले दिसत आहेत. कारण या वर्षी वेगवेगळ्या पक्षांच्या १५ बड्या नेत्यांविरोधात तपास यंत्रणेने (ईडी, सीबीआय व आयकर) कारवाईचा फास आवळला आहे. त्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधींपासून संजय राऊत, नवाब मलिक, सत्येंद्र जैन, पार्थ चॅटर्जी आदींचा समावेश आहे.

२०१४ पासून ते आतापर्यंत सुमारे १२१ नेते एकट्या ईडीच्या चौकशीच्या घेऱ्यात आले आहेत. त्यापैकी ११५ म्हणजेच सुमारे ९५% विरोधी पक्षाचे आहेत. तथापि, युपीएच्या कार्यकाळात २००४ ते २०१४ दरम्यान केवळ २६ नेते ईडीच्या रडारवर होते आणि त्यापैकी १४ म्हणजे ५४% विरोधी पक्षांचे होते. तर २००४ ते २०१४ दरम्यान सीबीआयने ७२ नेत्यांवर कारवाई केली. पैकी ४३ विरोधी पक्षाचे होते. २०१४ ते आतापर्यंत १२४ नेते सीबीआयच्या चक्रव्युहात अडकले. पैकी ११८ विरोधी पक्षांचे आहेत.

ईडी सर्वात जास्त सक्रिय १-२. सोनिया-राहुल गांधी; नॅशनल हेराॅल्ड प्रकरणी ईडीकडून ऑगस्टमध्ये दोघांची कसून चौकशी. ३. हेमंत सोरेन; ईडीने खाण लीज पट्ट्यात झारखंडच्या सीएमना समन्स बजावले. प्रथमच एखाद्या सीएमची १० तास चौकशी झाली होती. ४. फारूक अब्दुल्ला; जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटना घोटाळ्यात ईडीने माजी मुख्यमंत्र्याविरुद्ध जुलैमध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. ५. सत्येंद्र जैन; ३० मे रोजी मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्लीच्या मंत्र्यांना अटक.

ईडी सर्वात जास्त सक्रिय ६. कार्ती चिदंबरम; लाच घेऊन चीनी नागरिकांना व्हिसा दिल्याच्या आरोपाखाली सीबीआयने १७ मे रोजी या खासदाराच्या घरी छापा टाकला होता. ७. संजय राऊत; ऑगस्टमध्ये पत्रा चाळ प्रकरणात शिवसेना खासदारांना ईडीकडून अटक. ८. नवाब मलिक; ईडीने फेब्रुवारीत मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारच्या अल्पसंख्याक मंत्र्यांना अटक केली होती. {पी. चिदंबरम, पार्थ चॅटर्जी, अभिषेक बॅनर्जी, विनय मिश्रा, अनुब्रत मंडल, तेलंगणाचे मल्ला रेड्‌डी, गंगुला हेही तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकले.

बातम्या आणखी आहेत...