आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Year's Monsoon Rains Are Expected To Be Above Or Below Average, According To Skymet | Marathi News

मोसमी पाऊस:यंदा सलग चौथ्या वर्षी मोसमी पाऊस सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त, स्कायमेटच्या ताज्या अंदाजाने आशा

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्मा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ...अर्थात २०२२ मध्येही मान्सून अर्थव्यवस्थेला मजबूत करणार

देशात या वर्षीही मोसमी पाऊस सरासरीइतका अथवा त्यापेक्षाही अधिक पडणार आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या संस्थेच्या भाकितानुसार सन २०२२ मधील मान्सून सामान्य असेल. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस ९६% ते १०४ % राहील. सलग चार वर्षे माेसमी पाऊस सरासरीइतका अथवा त्यापेक्षा अधिक पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी सन २००८ मध्ये असे घडले होते. २०१९, २०२०, २०२१ या तीन वर्षांत क्रमशः ११०%, १०९% आणि ९९% पावसाची नोंद झाली होती. तत्पूर्वी, सन २००५ ते २००८ या काळात असे झाले होते.

भारतात मान्सूनमध्ये पडणाऱ्या पावसाची माहिती सन १९०० पासून गोळा केली जात आहे. त्याचे विश्लेषण केल्यास सलग चार वर्षे सरासरीइतका अथवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याच्या घटना गेल्या १२१ वर्षांमध्ये केवळ ७ वेळा घडल्या आहेत. भारतीय हवामान खाते एक एप्रिल रोजी पहिला हवामान अंदाज जाहीर करेल. स्कायमेटनेही एप्रिलमध्येच मान्सूनबाबत तपशीलवार अहवाल जाहीर करणार असल्याचे सांगितले. स्कायमेटचे अध्यक्ष जी.पी. शर्मा यांनी ‘भास्कर’शी बोलताना सांगितले की, मान्सूनचे आगमन, तीव्रता, त्याचा कालावधी आणि परतण्याची वेळ यात महदंतर आहे. त्यामुळे तीन महिने आधी त्याच्या सर्व पैलंूविषयी अंदाज वर्तवणे कठीण आहे. तथापि, ४ महिन्यांच्या दीर्घ हंगामामुळे प्रारंभीचे आकलन करण्यासाठी हे पुरेसे आहे. त्यामुळेच देशात यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता कमी आहे, हे सांगणे शक्य होते.

चांगल्या मान्सूनचे प्रमुख कारण ‘ला निना’ चे न्यूट्रल होणे
स्कायमेटचे अध्यक्ष जी.पी. शर्मा यांच्या मते , ‘ला नीना’चा गेल्या दोन हंगामात नैऋत्य मोसमी पावसावर विपरीत परिणाम झाला. सन २०२२ च्या मान्सूनच्या समाप्तीपर्यंत ‘ला नीना’ न्यूट्रल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. प्रशांत महासागराच्या परिसरात तापमान वाढण्याची शक्यता असल्याने ‘ला निना’चा परिणाम कमी होईल, त्यामुळे पाऊस सरासरीइतका पडेल.
देशात २०२१ मध्ये माेसमी पावसाची सुमारे 880.6 मिमी नोंद झाली. यंदाही तेवढाच पाऊस पडू शकतो.

बातम्या आणखी आहेत...