आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Those Who Can't Find A Job Anywhere Are Good At Getting Government Jobs: Nitin Gadkari

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:ज्यांना कोठेच नोकरी मिळत नाही ते सरकारी नोकरी मिळवण्यात तरबेज : नितीन गडकरी

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थलांतरित मजुरांच्या खाण्यापिण्यासाठी 60 हजार कँटीन, 8200 पाकगृहे उघडण्याची शिफारस

कोविड साथरोगाच्या काळात नोकरी, पगारवाढ व कायम नोकरी यावर बोलताना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सरकारी नोकरदारांना उद्देशून टोला लगावला. ते म्हणाले, ज्यांना कोठेच नोकरी मिळत नाही अशी मंडळी सरकारी नोकरी मिळवण्यात यशस्वी ठरतात. यापेक्षा या विषयावर मी फार बाेलणार नाही. गडकरी यांनी कोरोना साथरोगाच्या काळात बदलत्या परिस्थितीत कौन्सिल फॉर एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरचा अहवाल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने प्रसिद्ध केला. त्यांनी कौन्सिलच्या तज्ञांना सांगितले, सरकार संशोधनात स्कॉलर नाही. त्यामुळे हा जाडजूड अहवाल खंडात विभागून द्यावा. त्यामुळे तो समजेल तरी. सरकारमध्ये गुणवत्ता खूप आहे, पण यंत्रणा वाईट आहे. त्यात संशोधनाचे वातावरण नाही. नॉलेज वेल्थमध्ये व वेस्टला वेल्थमध्ये बदलले पाहिजे. सगळे काही टाकाऊ नसते. सरकारी कँटीन सुरू केल्या पाहिजेत.

सुमारे ३ काेटी स्थलांतरित मजूर आहेत. त्यांच्यासाठी देशभरात सरकारी मदतीने ६० हजार कँटीन व ८२०० पाकगृहे सुरू करावीत, अशी शिफारस कौन्सिलने केली आहे. यामुळे किमान तीन वेळा स्वच्छ, परवडणारे व पोषक असा आहार उपलब्ध होईल, असे ते म्हणाले. या प्रकल्पावर सुमारे २५ हजार कोटी रुपये खर्च येईल. कँटीनमध्ये एक वेळच्या जेवणासाठी १५ रुपये दर आकारावा.

१२ लाख लोकांना नोकऱ्या उपलब्ध : 

प्रवासी कँटीन प्रकल्पातून सुमारे १२ लाख लाेकांना नोकऱ्या मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. प्रत्येक कँटीनमध्ये २० लोकांना काम मिळेल. प्रत्येक कँटीनमधून ५०० स्थलांतरित मजुरांना जेवण दिले जाईल. अहवालात एक इंटिग्रेटेड इमर्जन्सी सर्व्हिलान्स सिस्टिम तयार करण्याची शिफारस केली आहे. आपत्तीचा नियोजनपूर्वक सामना करता येईल. ही यंत्रणा तयार करण्यावर ५ कोटी रुपये खर्च होतील. जर अशी यंत्रणा भारतात असती तर देशाला ६.७५ लाख कोटी रुपये वाचले असते.

भारताने गमावले तब्बल १३ लाख कोटी रुपये

कौन्सिलच्या अहवालात संयुक्त राष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने एक अंदाज व्यक्त केला असून गेल्या दोन दशकात भारतास हवामान बदल व व्हेक्टरजन्य आजारांत १३ लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. यापैकी ७.५३ लाख कोटी रुपयाचे नुकसान आजारात झाले आहे. कोविडमुळे झालेली हानी यात समाविष्ट नाही.

बातम्या आणखी आहेत...