आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Those Who Have Ruled For Decades Are Lying To The Farmers, PM Modi Accuses Leaders Who Opposing Agriculture Bill

शेतीविषयक विधेयक:अनेक दशके राज्य करणारेच शेतकऱ्यांशी खोटे बोलत आहेत, कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्या नेत्यांवर पीएम मोदींचा आरोप

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल म्हणाले- शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास उडाला

लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी क्षेत्राशी संबंधित तिन्ही विधेयकांवरून रालोआतील सहकारी अकाली दलासह काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधेयकांना विरोध करत असलेल्या विरोधी पक्षांवर ते सर्रास खोटे बोलत असल्याचा आणि संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप केला. बिहारमधील कोसी रेल्वे पुलाचे शुक्रवारी ऑनलाइन उद्घाटन करताना मोदी म्हणाले, ‘या विधेयकांमु‌‌ळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दलाल संपतील. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल.’ राहुल गांधी आणि काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर िनशाणा साधताना मोदी म्हणाले की, ही विधेयके शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच आहेत. पण अनेक दशकांपासून सत्तेत राहिलेले, देशावर राज्य केलेले लोकच शेतकऱ्यांशी खोटे बोलत आहेत.

राज्यसभेत विधेयकांच्या बाजूने संख्याबळ गोळा करण्याचा प्रयत्न

या विधेयकांवर सरकारला राज्यसभेत घेरण्याची विरोधकांची तयारी आहे. विरोधकांच्या दाव्यानुसार, १०० वर खासदार विरोधात मत देतील. त्यात काँग्रेसच्या ४०, आपच्या ३, सपच्या ८ व बसपच्या ४ सदस्यांचा समावेश आहे. याउलट आपल्याला १३० खासदारांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास भाजपला आहे. त्यात भाजपचे ८६ सदस्य आहेत. अद्रमुक (९), टीआरएस (७), वायएसआर काँग्रेस (६) आणि शिवसेना (३) यांसारख्या रालोआत नसलेल्या पक्षांचा या विधेयकांना पाठिंबा आहे. एकूण डझनभर सदस्य असलेल्या अनेक लहान पक्षांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.

राहुल म्हणाले- शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास उडाला :

राहुल गांधींनी सोशल मीडियावर लिहिले-शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे. विधेयकांमुळे सरकार आपल्या ‘मित्रां’चा व्यापार वाढवेल व शेतकऱ्यांच्या भाकरीवर वार करेल हे त्यांना माहीत आहे.

हरसिमरत यांच्या राजीनाम्यावर शेतकरी नेते म्हणाले- उशीर झाला :

राजीनामा मंजूर झाल्यानंतर अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर म्हणाल्या, माझा विरोधी आवाज ऐकला गेला नाही. अमृतसरमध्ये शेतकरी नेते सरवनसिंह पंढेर म्हणाले, राजीनाम्याला उशीर झाला.

प्रत्येक शेतकऱ्याला मालाचा पूर्ण देशातील दर माहीत व्हावा अशी यंत्रणा तयार करतोय : कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर

आता कंपन्या शेतकऱ्यांकडून मनमानी दराने खरेदी करतील?

सध्या बाजारात जे ४०-५० व्यापारी असतात त्यांच्या बोलीतच दर निश्चित होतो. शेतकऱ्यांना देशभर काय दर आहेत याची माहिती व्हावी यासाठी एक यंत्रणा तयार करत आहोत. एसएमएसनेही ते माहीत होऊ शकते.

सहकारी पक्षांनाच समजावण्यात सरकारला अपयश आले का?

हा राजकीय विरोध आहे, वैयक्तिक स्वार्थासाठी. लोकशाहीत विरोधाचा अधिकार असल्याने विरोध करताहेत.

साठा मर्यादा नसल्याने कंपन्या साठेबाजी करू लागतील का?

सरकारी खरेदीनंतरही व्यापारी उत्पादन खरेदी करतात. आता प्रक्रिया करणारे थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करतील. साठेबाजी सरकारी नियंत्रणात जास्त होते.