आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Though BJP Is In The Role Of Big Brother, Nitish Kumar Will Be The Chief Minister Of Bihar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार निवडणूक:भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असला तरी बिहारमध्ये नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहार विधानसभेचा निकाल लागला आणि बिहारच्या जनतेने पुन्हा एनडीएला संधी दिली. पण, यावेळेस जदयूपेक्षा भाजपला जास्त जागा मिळाल्या आहेत. इतक्या दिवस राज्यात जदयू मोठ्या भावाच्या भूमिकेत असायचा पण, आता भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. असे असले तरी, मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील असे भाजपने जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांना शब्द दिला होता आणि आम्ही तो पाळणार आहोत, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला जागा कितीही मिळाल्या तरी मुख्यमंत्री हे नितीशकुमारच राहतील असे पंतप्रधानांनी सांगितले होते. त्यामुळे आम्ही शब्दाला जागणारे आहोत. नितीश कुमार यांची प्रतिमा ही स्वच्छ आहे. सत्तेसाठी आम्ही हपापलेले नाही, असेही फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...