आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा कहर:उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पूर आल्याने हजारो लोकांचे स्थलांतर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 राज्यांत जास्त, 15 मध्ये सरासरीहून कमी पाऊस
  • पूरग्रस्त भागात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे

देशातील उत्तर पश्चिमेकडील राज्यांत वेगवान वारे वाहू लागले आहेत. हाच मान्सूनसाठी अडसर ठरला आहे. म्हणूनच दिल्ली, हरियाणा, पंजाब व उत्तर राजस्थानमध्ये अजूनही मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु देशात मान्सूनचे आगमन झाल्यापासून १९ जूनपर्यंत एकूण ४१ टक्क्यांहून जास्त पाऊस झाला. १९ जूनपर्यंत सरासरी ८८.४ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत १२४.२ मिमी पाऊस झाला.

डेहराडून/पाटणा/ लखनऊ नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे देशातील ३० जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. पूरग्रस्त भागात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक नद्या कोपल्या आहेत. त्याचा तडाखा नेपाळच्या सीमेजवळील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहारमध्ये दिसून येत आहे. तीन राज्यांत पूरस्थिती आहे. पावसामुळे उत्तराखंडमधील अलकनंदा, मंदाकिनी, गंगा नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. हरिद्वारहून शनिवारी ४ लाख क्युसेक पाण्याचा गंगेत विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत धोका वाढला आहे. पूर्वांचलच्या ६ नद्या कोपल्या आहेत. पुराचा सर्वाधिक प्रभाव उत्तर प्रदेशातील महाराजगंज, कुशीनगर, गोरखपूर, , बहराईचमध्ये दिसून येत आहे. या जिल्ह्यात हजारो एकरवरील पीक पाण्यात गेले. ग्रामीण भागातील लोकांना घरेदारे सोडून स्थलांतरित होत आहेत. बिहारच्या गंडक, कोसी, घाघरा नद्यांना पूर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...