आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Thousands Of Dead Bodies Being Buried In UP On Banks Of River Ganga Due Lack Of Woods For Cremation Ceremonies In Uttar Pradesh

दहनविधीसाठी लाकडे नाहीत:उत्तर प्रदेशात अंत्यविधीची हिंदू परमपरा बदलण्याची मजबुरी; दहनविधी न करता गंगेच्या किनारी होत आहे हजारोंचा दफनविधी

कानपूर / अन्नावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा दफनविधी अगदी जवळ-जवळ आणि 3 फुट खोलवर केले जात आहेत
  • नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास पुन्हा संक्रमण वाढण्याचा आहे धोका

कोरोनाच्या महामारीने देशभर मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत उपचारासाठी ऑक्सिजन आणि औषधींची टंचाई होती. आता गत ही झाली की अंत्यविधीसाठी लाकडे कमी पडत आहेत. अशात उत्तर प्रदेशच्या प्रमुख शहरांमध्ये हिंदू परमपरा बदलण्यास मजबूर लोक आपल्या नातेवाइकांच्या मृतदेहावर दफनविधी करत आहेत.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या कानपूर आणि उन्नाव येथील हजारो लोकांचे मृतदेह गंगेच्या किनारी दफन केले जात आहेत. दैनिक भास्कर समूहाने याचा शोध घेतला असता हे वृत्त खरे निघाले आहे. गंगेच्या शेजारी हजारो मृतदेह दफन केल्याचे आम्हाला दिसून आले. पण, चिंतेची बाब म्हणजे हा दफनविधी केवळ 3 फुटांवर आटोपला जात आहे.

पाण्याची पातळी वाढल्यास वाहायला लागतील मृतदेह
कानपूर आणि उन्नाव येथे गंगेच्या किनाऱ्यावर भयंकर चित्र पाहायला मिळाले आहे. या ठिकाणी अवघ्या दोन दोन फुटांच्या अंतरावर आणि अवघ्या 3 फूट खड्ड्यांमध्ये मृतदेह पुरले जात आहेत. गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढताच हे मृतदेह पाण्यात मिसळतील आणि वाहू लागतील. यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका सुद्धा आहे. दफनविधी केल्या जाणाऱ्या लोकांपैकी सर्वांचाच मृत्यू कोरोनाने झालेला नाही. पण, ज्यांचा मृत्यू कोरोनाने झाला, त्या मृतदेहांतून कोरोना पसरण्याची भीती आहे. विशेष म्हणजे, कोट्यावधी लोकांना पाण्याचा पुरवठा याच ठिकाणावरून केला जातो.

दफनविधी कमी खर्चिक
गंगेच्या शेजारी आपल्या नातलगांचा दफनविधी पार पाडणाऱ्या लोकांशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, चितेला अग्नी देण्यापेक्षा दफनविधी करणे कमी खर्चिक आहे. त्यामुळे, मोठ्या संख्येने लोक दफनविधीला प्राधान्य देत आहेत. या दफनविधीमध्ये मीठ सुद्धा टाकले जात आहे.

लखनऊ-कानपूरमध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक 5,500 अंत्यविधी
स्थानिक प्रशासनाच्या आकडेवीराप्रमाणे, केवळ लखनऊ आणि कानपूरमध्ये 25 हजार क्विंटल लाकडांची अंत्यविधीसाठी खरेदी झाली आहे. कानपूर आयआयटी सारख्या संस्थांकडून मोफत लाकडे मोफत पुरवल्या जात असताना ही आकडेवारी खूप मोठी आहे. दोन्ही शहरांमध्ये एप्रिल महिन्यात 5,500 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लखनऊ महापालिकेला अंत्यविधीसाठी हवे 20 कोटी रुपये
दहनविधीचा वाढता खर्च पाहता लखनऊच्या महापालिका आयुक्तांनी शासनाकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे. पण, 7 मे रोजी जारी करण्यात आलेल्या एका निर्देशानुसार अंत्यसंस्काराचे बजेट 15 व्या अर्थसंकल्पातच सादर करणार असल्याचे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यामध्ये प्रत्येक अंत्यविधीवर 5 हजार रुपये खर्च होतात असा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...