आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Thousands Of Women Came To The Recruitment Drive Of Special Police Officers With The Spirit Of Serving The Country In Jammu Kashmir

जम्मू-काश्मीरमध्ये महिलांचा सहभाग:विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या भरती मोहिमेत देशसेवा करण्याच्या भावनेने आल्या हजारो महिला

कठुआ2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या भरतीत महिलांची संख्या मोठी होती. - Divya Marathi
विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या भरतीत महिलांची संख्या मोठी होती.
  • 100 पदांच्या भरतीसाठी आले 25 हजार लोक, महिलांची संख्या जास्त
  • चाचणीसाठी आलेल्या महिलांमध्ये पोलिस विभागाच्या निर्णयाने उत्साह

जम्मू-काश्मीरमध्ये आता महिलाही पुढे येत आहेत. कठुआ जिल्ह्यात शनिवारी विशेष पोलिस अधिकाऱ्यांची भरती मोहीम घेण्यात आली. १०० रिक्त पदे भरण्यासाठी सुमारे २५ हजार लोक आले होते. यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या पदासाठी चाचणी देण्यास आलेल्या महिलांमध्ये जम्मू -काश्मीर पोलिस विभागाच्या निर्णयामुळे खूप उत्साह दिसून आला. दीक्षा नावाच्या एका महिला उमेदवाराने म्हटले, ‘सरकारने आम्हाला नोकरीसाठी चांगली संधी दिली आहे. मला देशसेवा करायची आहे. देशासाठी मला सर्वोत्तम सेवा बजावायची आहे. मी येथे पोलिसांना चाचणी देण्याच्या निर्णयाबद्दल खूप धन्यवाद देते. भरतीसाठी आलेल्या इतर महिलांनीही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या वर्षी केंद्र सरकारने कलम ३७० व ३५ (अ)हटवले होते. याआधी या कलमानुसार येथील महिलांना सरकारी नोकरीत समानाधिकार नव्हता.

जम्मूृ-काश्मीरमध्ये महिलांचे प्रमाण अत्यल्प..

सरकारने जम्मू-काश्मीरमधील महिलांचे सबलीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. सरकारी नोकऱ्यांत त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी भर देण्यात येत आहे. सध्या महिलांचे प्रमाण कमी आहे. जम्मू-काश्मीर पोलिस विभागात एक लाख कर्मचारी आहेत. २०१९ च्या आकडेवारीनुसार आता महिलांचे प्रमाण फक्त ३ टक्के होते.

बातम्या आणखी आहेत...