आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Threat Call To Mukesh Ambani On Reliance Foundation Number, Mumbai Police Investigating Case Updates

मुकेश अंबानींना पुन्हा धमकी:रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयात कॉल, म्हटले- 3 तासांत अख्खे कुटुंब संपवू; एकाला अटक

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या डिस्प्ले क्रमांकावर धमकीचे 8 फोन कॉल आले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीने तीन तासांत संपूर्ण कुटुंबाला ठार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी दहिसर परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

रुग्णालय व्यवस्थापनाने याप्रकरणी डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी तीन पथके तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. कॉलर एकच असून त्याने सलग आठ कॉल केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. यानंतर फोन करणाऱ्याचे लोकेशन ट्रेस करून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी अजूनही सुरू आहे.

मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा हा फोटो 15 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाला आहे. मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वीही त्यांच्या कडेवर दिसत आहे.
मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा हा फोटो 15 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाला आहे. मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वीही त्यांच्या कडेवर दिसत आहे.

पकडलेला आरोपी मानसिकदृष्ट्या विक्षिप्त, सुरक्षा व्यवस्था कडक

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत कॉलर मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याची सविस्तर चौकशी होणे बाकी आहे. यापूर्वी अंबानींना धमकीची तक्रार मिळताच मुंबई पोलीस सतर्क झाले होते. पोलिस आयुक्तांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर अंबानी कुटुंब आणि अँटिलियाची सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

रिलायन्सचे निवेदन

याप्रकरणी रिलायन्सने अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या सार्वजनिक क्रमांकावर अज्ञाताकडून धमकीचे कॉल आले. फोन करणाऱ्याने मुकेश अंबानी यांच्या नावाने धमकी दिली. याप्रकरणी डीबी मार्ग पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये एफआयआर नोंदवण्यात येत आहे. दहिसर परिसरातून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

आम्ही हॉस्पिटलमध्ये ध्वजारोहण समारंभाची सांगता करत असताना, आम्हाला त्याच कॉलरचे 8 ते 9 कॉल्स आले ज्यात सकाळी 10.45 ते दुपारी 12.00 पर्यंत आमच्या चेअरमनला धमकी देण्यात आली. त्यानंतर लगेचच मुंबई पोलिसांना सतर्क करण्यात आले, एफआयआर दाखल करण्यात येत आहे आणि कॉलरचे अधिक तपशील समजून घेण्यासाठी टीमने तपास सुरू केला आहे. एचएन रिलायन्स हॉस्पिटलचे सीईओ डॉ. तरंग ग्यानचंदानी यांनी ही माहिती दिली.

मुकेश अंबानींच्या मुंबईतील घर अँटिलिया येथे इतर सामान्य दिवशीही कडक सुरक्षा व्यवस्था असते. ताज्या तक्रारीनंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मुकेश अंबानींच्या मुंबईतील घर अँटिलिया येथे इतर सामान्य दिवशीही कडक सुरक्षा व्यवस्था असते. ताज्या तक्रारीनंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

नोव्हेंबरमध्ये अँटिलियाजवळ सापडली होती स्फोटकांनी भरलेली कार

याआधी नोव्हेंबर 2021 मध्ये मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांचे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचे नाव पुढे आले आहे. एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये ही एसयूव्ही मुकेश अंबानींच्या घर अँटिलियाजवळ संशयास्पद स्थितीत पार्क केलेली आढळली. त्यातून स्फोटके जप्त करण्यात आली होती.
फेब्रुवारी 2021 मध्ये ही एसयूव्ही मुकेश अंबानींच्या घर अँटिलियाजवळ संशयास्पद स्थितीत पार्क केलेली आढळली. त्यातून स्फोटके जप्त करण्यात आली होती.

मुकेश अंबानी यांना Z+ सुरक्षा

मुकेश अंबानी यांना हिजबुल मुजाहिद्दीनकडून धमक्या आल्यानंतर 2013 मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने Z+ सुरक्षा प्रदान केली होती. त्यांची पत्नी नीता अंबानी यांना 2016 मध्ये केंद्र सरकारने Y+ सुरक्षा प्रदान केली होती. त्यांच्या मुलांनाही महाराष्ट्र सरकारकडून दर्जेदार सुरक्षा दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...