आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Threats To Kill Parents From Pubji Friend; 1 Lakh Removed After Sending The Link

फसवणूक:पब्जी फ्रेंडकडून पालकांना मारण्याची धमकी; नंतर लिंक पाठवून 1.30 लाख रु. काढले

सोलन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशात प्रथमच पब्जी खेळताना फसवणुकीचे प्रकरण घडले. ही फसवणूक एका १३ वर्षीय मुलासोबत खेळणाऱ्या मित्रानेच केल्याचे सांगण्यात येते. सोलन येथील एका अल्पवयीन मुलास पैसे न दिल्यास आई-वडिलांना ठार मारण्यात येईल, अशी धमकी एका गुंडाने दिली. यामुळे घाबरलेल्या मुलाने गुंडाने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले. नंतर त्यास ओटीपी सांगितला. अशा प्रकारे एका महिन्यात त्याच्या पालकांच्या खात्यातून १.३० लाख रुपये काढले. पालकांना माहिती समजू नये म्हणून मुलाने पालकांच्या मोबाइलवरील मेसेजेस व ओटीपी डिलीट केले. सोमवारी मुलाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली. सोलनचे एसपी अभिषेक यादव यांनी सांगितले, फसवणुकीच्या तक्रारीची चौकशी करत आहोत. पोलिसांनी सांगितले, ऑनलाइन क्लासमुळे आईने मुलास मोबाइल दिला होता. परंतु तो त्यावर पब्जी गेम खेळू लागला. पब्जी खेळणाऱ्या एका गुंडाने त्याला धमकावून पैसे काढण्याची योजना आखली. काही दिवसांपूर्वी पालकांना संशय आला. नंतर मुलाने आपल्याला धमक्या देऊन पैसे उकळल्याचे सांगितले.