आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालच्या पानीहाटी स्थित इस्कॉन मंदिरात आयोजित दंड महोत्सवात रविवारी गरमी व आर्द्रतेमुळे 3 भाविकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासंबंधी एका ट्विटद्वारे घटनेवर हळहळ व्यक्त केली. त्या म्हणाल्या -"पानीहाटीच्या इस्कॉन मंदिरातील दंड महोत्सवात गरमी व आर्द्रतेमुळे 3 भाविकांचा मृत्यू झाल्यामुळे दुःख झाले. उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत. मदतीचे सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत."
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील पानीहाटीतील महोत्सवाला घाटावर इस्कॉनच्या दंड महोत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. कोरोना महामारीमुळे 2 वर्षांनंतर झालेल्या या उत्सवासाठी जमलेल्या गर्दीमुळे गरमी व आर्द्रता वाढली होती. गर्मीमुळे झालेल्या अफरातफरीमुळे 2 जणआंचा बळी गेला. तर 50 हून अधिक जण आजारी पडले.
महोत्सव गुंडाळला
बॅरकपूरच्या संयुक्त पोलिस आयुक्त ध्रवज्योती डे यांनी या घटनेनंतर गंभीर आजारी पडलेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. तर पानीहाटी नगर परिषदेचे अध्यक्ष मोलॉय रॉय यांनी 2 महिलांसह 3 भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर सदर महोत्सव गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट केले. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची कुमक घटनास्थळी हजर असल्याचेहीत त्यांनी यावेळी सांगितले.
गरमी व आर्द्रतेमुळे झाला होता केकेचा मृत्यू
सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ (केके) यांचा काही दिवसांपूर्वी कोलकत्यात लाइव्ह शोमध्ये मृत्यू झाला होता. त्यांना कार्डियाक अरेस्ट आला होता. त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. केके 53 वर्षांचे होते. सभागृहात झालेल्या गर्दीमुळे वातावरणात गरमी व आर्द्रता वाढली होती. यामुळे केकेंची प्रकृती बिघडली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.