आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जवानांवर हल्ला:मणिपुरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे 3 जवान शहीद, 4 गंभीर अवस्थेत; आयईडीचा स्फोट आणि गोळ्याही झाडल्या

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • म्यांमार सीमेजवळ चंदेल जिल्ह्यात हल्ला करण्यात आला
  • हल्लोखोर हे लोकल ग्रुप पीपुल्स लिबरेशन आर्मीचे आहेत

मणिपुरची राजधानी इम्फालमधून 100 किलोमीटर दूर चंदेल जिल्ह्यात अतिरेक्यांच्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे 3 जवान शहीद झाले आहेत. यासोबतच चार जवान गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. अतिरेकी हे एक लोकल ग्रुप पीपुल्स लिबरेशन आर्मीचे होते.

भारत-म्यांमार सीमेवर अतिरेकी समूहांविरोधात ऑपरेशन सुरू करण्यात आलेले होते. यादरम्यान जवान अतिरेक्यांच्या कचाट्यात सापडले. निशाणा लावून बसलेल्या अतिरेक्यांनी जवानांवर गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर सैन्याने अतिरेक्यांचा शोध घेत आहेत. यासोबतच भारत-म्यांमार सीमेवर चौकशी वाढवण्यात आली आहे.

अतिरेक्यांनी नोव्हेंबर 2019 मध्येही चंदेल जिल्ह्याजवळील आसाम रायफल्सच्या कँपवर हल्ला केला होता. कँपवर बॉम्ब फेकण्यात आले होते. यानंतर दोन्ही बाजुंनी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. नंतर अतिरेक्यांनी पळ काढला होता. या हल्ल्यात सैन्याचा कोणताही जवान जखमी झाला नव्हता.