आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेहराडून:उत्तराखंडात ढगफुटीमुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू, एसडीआरएफ, एनडीआरएफकडून मदत व बचाव कार्य

डेहराडून2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडातील उत्तरकाशीत ढग फुटल्याने आणि मुसळधार पावसाने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. यात दोन महिला व एका मुलीचा समावेश आहे. एक युवक पुरात वाहून गेला.

उत्तरकाशी आणि टिहरी जिल्ह्यांमध्ये रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला होता. यात तीन जण जखमी झाले होते. सुमारे दीड डझन घरांचे नुकसान झाले होते. प्रशासनाने नुकसानग्रस्त गावांमध्ये एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि इतर बचाव पथकांना पाठवले आहे. अनेक लोकांनी पळून व सुरक्षित ठिकाणी जाऊन आपला जीव वाचवला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेतला जात आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. डेहराडूनमध्ये छिबरो जलविद्युत प्रकल्पात अडकलेल्या दोन मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...