आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Three Papers Leaked, Two time Chief Minister KCR On The Back Foot For The First Time, Son KTR Also On Target

तेलंगणात पेपर फुटी प्रकरण:3 पेपर फुटले, दोन वेळचे मुख्यमंत्री KCR पहिल्यांदाच बॅकफूटवर, मुलगा केटीआरही निशाण्यावर

एम. एस. शंकर | हैदराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणात पेपरफुटी प्रकरणामुळे दोन वेळचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना प्रथमच बॅकफूटवर यावे लागले आहे. विरोधकांनी पेपरफुटीप्रकरणी केसीआर, त्यांचा मुलगा के. तारक रामाराव (केटीआर) आणि मुलगी के. कविता यांना निशाण्यावर घेतले आहे. भाजप आणि काँग्रेसने पेपरफुटीमध्ये राज्य कॅबिनेटमधील मंत्री केटीआर व त्यांच्या जवळच्या लोकांचा हात असल्याचा आरोप केला आहे.

८ लाख परीक्षार्थींचे भविष्य संकटात
माध्यमिक मंडळाच्या हिंदी व तेलगूच्या ४ एप्रिलला पेपरफुटीदरम्यान झालेल्या परीक्षेला ४.९० लाख मुले बसली होती. राज्य परीक्षा आयोग (टीएसपीएससी) ग्रुप-वनचा पेपरही फुटला होता. यात तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पेपरफुटीमुळे जवळपास ८ लाख परीक्षार्थींचे भविष्य संकटात आले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांना केली अटक

भाजपला मोठा धोका म्हणत आहे तेलंगणातील सत्ताधारी बीआरएस : पेपरफुटीत बीआरएसला भाजप-काँग्रेस दोघांनी घेरले आहे. मात्र, भाजप हा मोठा धोका असल्याचे बीआरएसचे म्हणणे आहे. फुटीमध्ये नाव घेतल्यामुळे केटीआर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष संजय कुमार यांच्याविरुद्ध एक कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवत रेड्‌डी यांनीही आरोप लावले होते. तेलंगणात भाजपच्या वाढत्या जनाधाराला बीआरएस मोठे आव्हान मानत आहे.

निवडणुकीत आपले पारडे कमकुवत असल्याचे पाहून काँग्रेससोबत डील करू शकतात केसीआर : राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, केसीआर पेपर फुटी प्रकरणात काँग्रेसच्या आरोपांनंतरही सॉफ्ट आहेत. सूत्रांच्या मते, केसीआर यांना पुन्हा सत्ता मिळवण्याची शक्यता कमीच दिसत असेल तर ते काँग्रेससोबत ‘डील’ करू शकतात. ही डील आैपचारिकही असू शकते आणि बंद दाराआडचीही असून शकते.