आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Three Police Officers Acquitted From CBI Court In Ishrat Jahan Encounter Case, Court Confesses Ishrat Terrorist

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इशरत जहां एनकाउंटर:CBI कोर्टाने म्हटले- इशरत जहां लश्कर-ए-तैयबाची दहशतवादी होती; या प्रकरणातील क्राइम ब्रांचच्या 3 अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका

अहमदाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 जून 2004 ला अहमदाबादच्या कोतरपुर वॉटरवर्क्सजवळ एनकाउंटरमध्ये इशरत जहां, जावेद शेख, अमजद राम आणि जीशान जौहर ठार झाले होते.- फाइल फोटो। - Divya Marathi
15 जून 2004 ला अहमदाबादच्या कोतरपुर वॉटरवर्क्सजवळ एनकाउंटरमध्ये इशरत जहां, जावेद शेख, अमजद राम आणि जीशान जौहर ठार झाले होते.- फाइल फोटो।
  • कोर्टाने म्हटले- अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले

गुजरातमधील बहुचर्चित इशरत जहां एनकाउंटर प्रकरणी CBI कोर्टाने क्राइम ब्रांचचे तीन अधिकारी गिरीश सिंघल, तरुण बारोट आणि अंजू चौधरी यांची निर्दोष सुटका केली आहे. कोर्टाने म्हटले की, इशरत जहां, लश्कर-ए-तैयबाची दहशतवादी असल्याच्या गुप्त रिपोर्टला नाकारता येत नाही. यामुळेच या तीन अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले

2004 नंतर गुजरात सरकारने IPS जीएल सिंघल, रिटायर्ड DSP तरुण बारोट आणि असिस्टेंट सब-इंस्पेक्टर अंजू चौधरी यांच्या विरोधात इशरत जहां एनकाउंटर प्रकरणी कारवाई करण्यास नकार दिला होता. बुधवारी या प्रकरणी दाखल अर्जावर सुनावणी झाली. या प्रकरणी कोर्टाने म्हटले की, इशरत जहां दहशतवादी असल्याचे पुरावे आहेत. त्या तीन अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले.

क्राइम ब्रांचचे अधिकारी तरुण बारोट 2004 च्या इशरत जहां एनकाउंटरमध्ये सामील होते.
क्राइम ब्रांचचे अधिकारी तरुण बारोट 2004 च्या इशरत जहां एनकाउंटरमध्ये सामील होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

15 जून, 2004 ला अहमदाबादमधील कोतरपुर वॉटरवर्क्सजवळ पोलिस एनकाउंटरमध्ये इशरत जहां, जावेद शेख, अमजद राम आणि जीशान जौहर ठार झाले होते. गुप्त माहितीनुसार, हे सर्वजण लश्कर-ए-तैयबाशी संबंधित होते आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी आले होते.

यापूर्वी DG वंजारा (डाव्या बाजुला) आणि एन के अमीन (उजव्या बाजुला) यांची CBI कोर्टाने सुटका केली आहे.
यापूर्वी DG वंजारा (डाव्या बाजुला) आणि एन के अमीन (उजव्या बाजुला) यांची CBI कोर्टाने सुटका केली आहे.

या एनकाउंटरनंतर इशरत जहांची आई समीमा कौसर आणि जावेदचे वडील गोपीनाथ पिल्लईने हायकोर्टात अर्ज दाखल करुन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन केली होती. या प्रकरणी अनेक पोलिस अधिकाऱ्यांना अटक झाली होती.

बातम्या आणखी आहेत...