आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Three States Say Ahmedabad Surat Are Corona Hotspot, Do Not Send Trains From Here To Us

कोरोनाची भीती:तीन राज्ये म्हणाली - अहमदाबाद-सुरत कोरोना हॉटस्पॉट, येथून जाणाऱ्या गाड्या आमच्याकडे पाठवू नका

सूरत2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड सरकारला वाटते गुजरातची भीती

अहमदाबाद अहमदाबाद आणि सुरतमध्ये काेराेनाचे रुग्ण सतत वाढत असल्याने पश्चिम बंगाल, ओडिशा आणि छत्तीसगड राज्य सरकारे भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळेच अहमदाबाद, सुरत येथून येणाऱ्या गाड्या आपल्या राज्यात येऊ नयेत असे या राज्यांना वाटत आहे. यामुळे राज्यातील संसर्ग वाढण्याची भीती आहे. पश्चिम बंगाल सरकारनेदेखील गाड्यांची संख्या कमी करावी अशी लेखी मागणी केली हाेती. त्यानंतर रेल्वेने अहमदाबाद- हावडा मेल राेजएेवजी आता साप्ताहिक केली आहे. परंतु साप्ताहिक गाडीचा प्रारंभ काेणत्या तारखेपासून हाेणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. छत्तीसगड, आेडिशा व बंगालला जाणारी ही एकमेव गाडी हाेती. १ जूनपासून देशभरात २३० नियमित गाड्या विशेष म्हणून चालविण्यात येत आहेत. मार्ग असा आहे : अहमदाबाद- हावडा मेल सध्या अहमदाबादवरून सुरतमार्गे छत्तीसगडच्या रायपूर, बिलासपूर आणि आेडिशाच्या राउरकेला झारसुगुडावरून पश्चिम बंगालला जाते.

अहमदाबाद-हावडा मेल आठवड्यातून एकदा

सध्याच्या परिस्थितीत गुजरात आणि महाराष्ट्रात काेराेनाच्या प्रकरणात वेगाने वाढ हाेत आहे. मुंबईहून हावड्यासाठी राेज एक गाडी आहे, तर अहमदाबादवरून सुरतमार्गे हावड्याला जाण्यासाठी एक नियमित गाडी आहे. या गाड्यांद्वारे या राज्यातून माेठ्या संख्येने बंगालला येत असल्याचे बंगाल सरकारने रेल्वे बाेर्ड आणि पश्चिम रेल्वेला पत्र लिहून कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...